खोदकाम करणाऱ्या कंपनीविरुद्ध ‘बीएसएनएल’ करणार फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:21 PM2018-06-20T13:21:49+5:302018-06-20T13:21:49+5:30

अकोला : पाइपलाइन आणि केबल टाकण्यासाठी अकोला शहरातील ‘बीएसएनएल’चे केबल डॅमेज करणाºया कंपनीविरुद्ध आता बीएसएनएल कंपनी एफआयआर करून फौजदारी कारवाई करणार आहे. येत्या दोन दिवसांत ही तक्रार दाखल होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.

 'BSNL' to be made against the engraving company | खोदकाम करणाऱ्या कंपनीविरुद्ध ‘बीएसएनएल’ करणार फौजदारी

खोदकाम करणाऱ्या कंपनीविरुद्ध ‘बीएसएनएल’ करणार फौजदारी

Next
ठळक मुद्दे रचना कॉलनी, विद्युत भवन, इन्कम टॅक्स, टिळक मार्ग, मानेक टॉकीज परिसर, निमवाडी, गीतानगर-बायपास आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सेवा विस्कळीत झाली.आडवी बोअर करताना आधी लक्झरी स्टॅन्डजवळ, नंतर निमवाडीजवळची बीएसएनएलची मुख्य केबल लाइन तोडल्या गेली आहे.कोणतीही सूचना न देता केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

अकोला : पाइपलाइन आणि केबल टाकण्यासाठी अकोला शहरातील ‘बीएसएनएल’चे केबल डॅमेज करणाºया कंपनीविरुद्ध आता बीएसएनएल कंपनी एफआयआर करून फौजदारी कारवाई करणार आहे. येत्या दोन दिवसांत ही तक्रार दाखल होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.
अकोला शहरात गेल्या दोन वर्षांपासून सिमेंट काँक्रीट मार्गाची निर्मिती सुरू आहे. रचना कॉलनी, विद्युत भवन, इन्कम टॅक्स, टिळक मार्ग, मानेक टॉकीज परिसर, निमवाडी, गीतानगर-बायपास आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे शहरातील अनेक उद्योजकांच्या पॉस मशीन बंद पडल्या असून, त्यांना दररोज लाखोंचा फटका सहन करावा लागतो आहे. सोबतच इंटरनेट सेवा बंद पडल्याने अनेकांचे कामकाज प्रभावित झाले आहे. यातून बँका आणि शासकीय कार्यालयदेखील सुटले नाही. कोणतीही सूचना न देता केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. आडवी बोअर करताना आधी लक्झरी स्टॅन्डजवळ, नंतर निमवाडीजवळची बीएसएनएलची मुख्य केबल लाइन तोडल्या गेली आहे.

 कोणतीही सूचना न देता बीएसएनएलच्या केबलला डॅमेज केले, तर नियमानुसार एफआयआर दाखल केला जातो. याबाबत संपूर्ण माहिती काढली गेली असून, दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केबल तोडल्या गेल्याने बीएसएनएलची सेवा गत दोन दिवसांपासून विस्कळीत झाली आहे.
-कृष्णा शेंदूरकर, बीएसएनएल अभियंता, अकोला.

 

Web Title:  'BSNL' to be made against the engraving company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.