अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:21 PM2019-02-02T12:21:35+5:302019-02-02T12:21:41+5:30

अकोला : गत दोन ते अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Anil Doye as Chief Engineer of Akola Zone Mahavitran | अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये

अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये

Next

अकोला : गत दोन ते अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महावितरणच्याअकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भांडूप परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या डोये यांना पदोन्नती देऊन अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती देण्याचा आदेश महावितरणच्या मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून ३१ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला.
अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी महावितरणला १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सोडचिठ्ठी देऊन त्रिपुरा महावितरण कंपनीचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून मुख्य अभियंता पदाचा भार अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याकडे होता. महावितरण मुख्यालयातून ३१ जानेवारी रोजी पाच अधीक्षक अभियंत्यांना बढती देऊन त्यांची नियुक्ती मुख्य अभियंतापदी करण्यात आली. यामध्ये ठाणे शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल डोये यांना अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. अनिल डोये यांनी यापूर्वी अकोला येथे महावितरणमध्ये पायाभूत आराखडा (इन्फ्रा)चे अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहिले आहे. लवकरच ते मुख्य अभियंता पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Anil Doye as Chief Engineer of Akola Zone Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.