अकोला, वाशिम  जिल्ह्यात १.२९ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:42 AM2018-01-23T00:42:46+5:302018-01-23T00:43:20+5:30

​​​​​​​अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया गत तीन महिन्यांपासून  सुरू आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम संबंधित थकबाकीदार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली.

Akola, Washim district debt relief for 1.29 lakh farmers! | अकोला, वाशिम  जिल्ह्यात १.२९ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी!

अकोला, वाशिम  जिल्ह्यात १.२९ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी!

googlenewsNext
ठळक मुद्दे४८४ कोटी शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया गत तीन महिन्यांपासून  सुरू आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम संबंधित थकबाकीदार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली.
शासन निर्णयानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. गत तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. शासनामार्फत उपलब्ध निधीतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये  आतापर्यंत अकोला व वाशिम जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली.    
-जी.जी. मावळे
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था 

Web Title: Akola, Washim district debt relief for 1.29 lakh farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.