अकोला तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शनात सानिका पजई, जयंती वजिरे, पल्लवी वानखडे, स्वामिनी तायडे चमकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:21 PM2017-12-02T13:21:12+5:302017-12-02T13:23:39+5:30

अकोला : न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दोन दिवस पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सानिका पजई, माध्यमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची जयंती वजिरे, ग्रामीण भागातून प्राथमिक गटात रूपनाथ विद्यालय दहीहांडाची पल्लवी वानखडे, माध्यमिक गटात सरस्वती विद्यालय चिखलगावची स्वामिनी तायडे यांनी उपयोगी वैज्ञानिक प्रतिकृती सादर करून अव्वल स्थान पटकावले.

Akola taluka level science exhibition; Girls grab awards | अकोला तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शनात सानिका पजई, जयंती वजिरे, पल्लवी वानखडे, स्वामिनी तायडे चमकल्या

अकोला तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शनात सानिका पजई, जयंती वजिरे, पल्लवी वानखडे, स्वामिनी तायडे चमकल्या

Next
ठळक मुद्देजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी ३0 वैज्ञानिक प्रतिकृतींची निवडकोला तालुक्यातून ६0 शाळा आणि शहरातील ८0 शाळा सहभागी झाल्या होत्या.


अकोला : न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दोन दिवस पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सानिका पजई, माध्यमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची जयंती वजिरे, ग्रामीण भागातून प्राथमिक गटात रूपनाथ विद्यालय दहीहांडाची पल्लवी वानखडे, माध्यमिक गटात सरस्वती विद्यालय चिखलगावची स्वामिनी तायडे यांनी उपयोगी वैज्ञानिक प्रतिकृती सादर करून अव्वल स्थान पटकावले.
शुक्रवारी विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, अकोला एज्युकेशन सोसायटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रावसाहेब पारसकर, सचिव विलास देशपांडे, सहसचिव प्रा. के.आर. जोशी, प्राचार्य माधव मुन्शी, मुख्याध्यापक संघाचे अकोला तालुकाध्यक्ष अरूण बाहकर, मुख्याध्यापिका जोत्स्ना पुराडपाध्ये आदींची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान प्रदर्शनात अकोला तालुक्यातून ६0 शाळा आणि शहरातील ८0 शाळा सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शनात शहरी भागातून १५ आणि ग्रामीण भागात १५ वैज्ञानिक प्रतिकृतींची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट वैज्ञानिक प्रतिकृती सादर करणाºया विद्यार्थ्यांमध्ये शहरी भागातून इयत्ता ६ ते ८ वी प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाची श्रुतिका खंडारे, तृतीय क्रमांक शाहबाबू हायस्कूलचा अताब पटेल, चतुर्थ क्रमांक इंग्लिश हायस्कूलचा अभय वानखडे, पाचवा क्रमांक शिवाजी विद्यालयाच्या अथर्व सरोदे याने, माध्यमिक विभाग इयत्ता ९ ते १२ वी गटात द्वितीय क्रमांक मोहरीदेवी खंडेलवाल कन्या शाळेची जान्हवी बडोदेकर, तृतीय क्रमांक प्राजक्ता विद्यालयाचा गणेश म्हातोडकर, चौथे स्थान गुरूनानक विद्यालयाची प्रेरणा कौलकर, पाचवे स्थान होलीक्रॉसचा शिवम मालपाणी याने पटकावले. ग्रामीण भागातून ६ ते ८ वी गटात द्वितीय क्रमांक जय बजरंग विद्यालय कुंभारीचा प्रेमरत्न सरकटे याने, तृतीय क्रमांक महर्षी वाल्मीकी विद्यालयाची प्रज्ञा दामोदर, चौथा क्रमांक आशाबाई बोर्डे विद्यालय बोरगाव मंजू येथील कौस्तुभ वैराळे, पाचवा क्रमांक शंकर विद्यालय कोळंबीचा सचिन डिके, माध्यमिक ९ ते १२ वी गटात द्वितीय क्रमांक भौरदचा सुमित मस्तुद, तृतीय स्थान म्हैसांग येथील भारस्कर विद्यालयाचा स्वप्निल सोळंके याने, चौथे स्थान गाडगेबाबा विद्यालय दहीगावची अर्पिता तराळे, पाचवे स्थान महर्षी वाल्मीकी विद्यालय कळंबेश्वरचा पवन महल्ले यांनी पटकावले. संचालन श्रीमती धबाले यांनी, तर आभार प्रा. रवींद्र भास्कर यांनी मानले.



शिक्षकांच्या प्रतिकृती ठरल्या उत्कृष्ट
शाहबाबू उर्दू हायस्कूलचे शिक्षक मो. अकबर, सल्लिका फरहीन यांनी प्रथम, प्रयोगशाळा गटात विजयाबाई देशमुख विद्यालय सोनाळाचे व्ही.डी. वानखडे यांनी प्रथम स्थान पटकावले. ग्रामीण गटातून शारदा विद्यानिकेतन मलकापूर येथील शिक्षिका प्रीती गोपनारायण, शुभांगी शर्मा यांनी प्रथम स्थान, लोकसंख्या शिक्षण विषयात महर्षि वाल्मीकी विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर वारकरी, आशाबाई बोर्डे विद्यालयाचे शिक्षक बैस यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

 

Web Title: Akola taluka level science exhibition; Girls grab awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.