प्रवेशद्वाराच्या नामफलकात अडकले अकोला रेल्वेस्थानक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:53 PM2017-10-14T13:53:29+5:302017-10-14T13:55:13+5:30

Akola railway station stuck in the entrance gate name | प्रवेशद्वाराच्या नामफलकात अडकले अकोला रेल्वेस्थानक!

प्रवेशद्वाराच्या नामफलकात अडकले अकोला रेल्वेस्थानक!

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकरांनंतर आता टिपू सुलतान


अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर योद्धा टिपू सुलतान या तीन महापुरुषांच्या नामफलकांत सध्या अकोला रेल्वेस्थानक अडकले आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराचे परस्पर नामांतरण त्यांचे अनुयायी यांनी केले; मात्र रेल्वे प्रशासनाने अजूनही अधिकृतपणे तसे नाव जाहीर केलेले नाही.
गत काही वर्षांपूर्वी अकोला रेल्वेस्थानकाच्या जीआरपी पोलीस ठाण्यालगत असलेल्या प्रवेशद्वारास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एका रात्रीतून देण्यात आले. कमानीचे फ्लॅक्स बनवून रात्रीतून हे फलक लटकविण्यात आले. छत्रपतींच्या नावासोबत प्रेसिडंटच्या दुसºया हॉटेललगतच्या प्रवेशद्वारावरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान रात्रीतून लावली गेली. अकोला रेल्वेस्थानकाच्या दोन्ही गेटला महापुरुषांचे नाव रात्रीतून अनुयायींनी दिले. दोन्ही फलकांची नोंद जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी घेतली. दरम्यान, अकोला रेल्वेस्थानकाचे प्रबंधक यांनी याबाबतची संपूर्ण माहिती भुसावळ डीआरएम यांच्याकडे पाठविली. अकोला रेल्वेस्थानकाचे दोन प्रवेशद्वार दोन महापुरुषांच्या नावात अडकलेले असताना, अकोट फैलच्या दक्षिण रेल्वेस्थानक प्रवेशद्वारास टिपू सुलतान यांचे नाव लावण्याचा प्रयत्न झाला. यंदा मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई केली. प्रवेशद्वाराचे नामफलक लागू दिले नाही. पोलिसांच्या कारवाईवर एका विशिष्ट समाजाचा रोष व्यक्त होत आहे. अकोला रेल्वेस्थानक विविध अनुयायी यांचे शक्तिपीठ झाले आहेत. जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांच्या भूमिकेबाबत अकोला रेल्वे प्रबंधकांनी अहवाल पाठविला आहे. आता भुसावळ डीआरएम कार्यालयाकडून कायदा व सुरक्षिततेबाबत काय निर्देश येतात, अधिकृतपणे नावे जाहीर होतात की फलक काढले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- अकोला रेल्वेस्थानकाच्या कोणत्याही प्रवेशद्वाराचे नाव अधिकृ तपणे दिलेले नाही. यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईची नोंद आम्ही वरिष्ठांकडे पाठविली आहे. आता पुढील निर्देश आल्यानंतर काय ते ठरविता येईल.
-जी.बी. मीणा, स्टेशन मास्तर, रेल्वे स्टेशन, अकोला.

Web Title: Akola railway station stuck in the entrance gate name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.