अकोला : भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:30 AM2017-12-30T01:30:10+5:302017-12-30T01:30:21+5:30

अकोला: भूखंड घोटाळ्यातील आरोपी झांबड पिता-पुत्राला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, आरोपी रमेश झांबड याची प्रकृती बिघडल्याने, त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

Akola: Plot Scam; The hidden father-son's custody extended | अकोला : भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

अकोला : भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

Next
ठळक मुद्देरमेश झांबड यांची प्रकृती बिघडली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भूखंड घोटाळ्यातील आरोपी झांबड पिता-पुत्राला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, आरोपी रमेश झांबड याची प्रकृती बिघडल्याने, त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 
शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिराजवळील भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ पैकी असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत संगनमत करून, गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेण्यात आली आणि हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. 
आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी तपास करून, गजराज झांबड याच्या नावावर असलेला भूखंड दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांनी संगनमत करून, लाटण्याचा डाव साधल्याचे समोर आले होते.
 या प्रकरणात झांबड पिता-पुत्राविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. झांबड पित्रा-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

Web Title: Akola: Plot Scam; The hidden father-son's custody extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.