अकोला :  शिष्यवृत्तीचा ऑनलाइन गोंधळ अखेर थांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:45 AM2018-01-12T01:45:30+5:302018-01-12T01:46:15+5:30

अकोला :  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व दिल्या जाणार्‍या विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्यानंतर अखेर ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तयारी समाजकल्याण आयुक्तालयाने केली आहे. त्यासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २0१७-१८ साठी महाडिबिटी पोर्टलवरून वगळण्यात आली आहे. 

Akola: Online confusion of scholarship finally stopped! | अकोला :  शिष्यवृत्तीचा ऑनलाइन गोंधळ अखेर थांबला!

अकोला :  शिष्यवृत्तीचा ऑनलाइन गोंधळ अखेर थांबला!

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाइन करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व दिल्या जाणार्‍या विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्यानंतर अखेर ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तयारी समाजकल्याण आयुक्तालयाने केली आहे. त्यासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २0१७-१८ साठी महाडिबिटी पोर्टलवरून वगळण्यात आली आहे. 
यावर्षीच्या शैक्षणिक सत्रातील निम्मा कालावधी उलटला. तरीही चालू शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्तीचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा आदेश देण्यात आला. त्याचवेळी त्यामध्ये प्रचंड अडचणीही निर्माण झाल्या. 
त्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्जाबाबत राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकार्‍यांचा गोंधळ झाला. त्याबाबत आयुक्तालयाने मार्गदर्शन करावे, असा पवित्रा १८ डिसेंबर रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये घेतला. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि प्रशासकीय यंत्रणेची त्यातून तात्पुरती सुटका करण्यात आली. त्यामध्ये चार प्रकारांतील शिष्यवृत्तीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यातच जमा केली जाणार आहे. त्यासाठी अर्जासोबत ही माहिती घेतली जाणार आहे. 

या शिष्यवृत्तीसाठी ऑफलाइनची सोय
ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची सोय चार योजनेतील लाभार्थीसाठी करण्यात आली. त्यामध्ये राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इयत्ता ५ वी ते ७ वी), सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी ते १0 वी), माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शालांतपूर्व अपंग शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर अपंग शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे. 

महाडिबिटी पोर्टलवर अर्ज करण्याची गरज नाही!
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २0१७-१८ साठी महाडिबिटी पोर्टलवरून वगळण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालू सत्रासाठी त्या पोर्टलवर अर्ज करू नये, असे आवाहन प्रभारी समाजकल्याण अधिकारी योगेश जवादे यांनी केले आहे. 

Web Title: Akola: Online confusion of scholarship finally stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.