अकोला-पूर्व निवडणूक निकाल : रणधीर सावरकर यांनी गड कायम राखला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 03:40 PM2019-10-24T15:40:18+5:302019-10-24T16:44:29+5:30

Akola-east Vidhan Sabha Election Results 2019: हरीदास भदे यांना पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहूमान मिळविला.

Akola-east Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019: Randhir sawarkar ween | अकोला-पूर्व निवडणूक निकाल : रणधीर सावरकर यांनी गड कायम राखला 

अकोला-पूर्व निवडणूक निकाल : रणधीर सावरकर यांनी गड कायम राखला 

googlenewsNext

अकोला : विकासकामांचा दावा करत निवडणुकीला सामोरे गेलेल्या अकोला पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी गड कायम राखण्यात यश मिळविले आहे. विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी झालेल्या मतमोजणीत सावरकर यांनी त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे हरीदास भदे यांना पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहूमान मिळविला. रणधीर सावरकर 24723 मताधिक्याने विजयी झाले.

रणधीर सावरकर यांना 100475 मते मिळाली असून, भदे यांना ७५752 मते मिळाली आहेत. काँग्रेसचे विवेक पारसकर ९533 मते घेऊन तिसºया स्थानावर राहिले. सावरकर आणि भदे यांच्यात चुरशीची लढत झाली; परंतु सावरकर यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेत निर्णायक मते मिळविली. २६ व्या फेरीअखेर त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीचा बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर केवळ नीळकं ठ सपकाळ आणि हरिदास भदे या दोघांनाच दोन वेळा विजयाची संधी मिळालेली आहे. यावेळी भाजपाचे रणधीर सावरकर व वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे पुन्हा रिंगणात होते. सावरकर यांनी या निवडणुकीत बाजी मारत या मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी मिळालेले ते तिसरे आमदार ठरले आहेत.

Web Title: Akola-east Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019: Randhir sawarkar ween

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.