अकोला जिल्ह्यात सोमवारपासून पीक कर्ज मेळावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:32 PM2019-07-14T14:32:34+5:302019-07-14T14:34:14+5:30

जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १५ ते ३० जुलै दरम्यान पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत.

Akola district will start a crop loan program from Monday! | अकोला जिल्ह्यात सोमवारपासून पीक कर्ज मेळावे!

अकोला जिल्ह्यात सोमवारपासून पीक कर्ज मेळावे!

Next
ठळक मुद्देशेतकºयांच्या तक्रारींचे निवारण या पीक कर्ज मेळाव्यांमध्ये करण्यात येणार आहे.संबंधित कर्मचारी पीक कर्ज मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक तालुक्यांत १५ ते २५ गावांमध्ये पीक कर्ज मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


अकोला : जिल्ह्यात सोमवार, १५ जुलैपासून तालुकानिहाय पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार असून, त्यामध्ये पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १५ ते ३० जुलै दरम्यान पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत. पीक कर्ज मेळाव्यांमध्ये बँक खाते नसलेल्या शेतकºयांचे बँक खाते काढून पात्र शेतकºयांचे पीक कर्जासाठी अर्ज भरणे, पुनर्गठनासाठी पात्र व संमतीपत्र देणाºया शेतकºयांचे कर्जाचे पुनर्गठन करणे, पीक कर्जासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करणे तसेच पीक कर्जासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण या पीक कर्ज मेळाव्यांमध्ये करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये ग्रामपंचायत भवन, सेवा सहकारी सोसायटींच्या कार्यालयात पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत. संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल यांच्यासह संबंधित कर्मचारी पीक कर्ज मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, सहायक निबंधकांचे पथक पीक कर्ज मेळाव्यांना भेटी देणार आहेत. पीक कर्जासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारी व अडचणींचे निवारण पीक कर्ज मेळाव्यांमध्ये करण्यात येणार आहे. असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

पीक कर्ज मेळाव्यांचे तालुकानिहाय असे आहे नियोजन!
अकोला तालुक्यात १५ व १६ जुलै, मूर्तिजापूर तालुक्यात १७ व १८ जुलै, बार्शीटाकळी तालुक्यात १९ व २० जुलै, पातूर तालुक्यात २२ व २३ जुलै, अकोट तालुक्यात २६ व २७ जुलै आणि बाळापूर तालुक्यात २९ व ३० जुलै रोजी पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत.

प्रत्येक तालुक्यात १५ ते २५ गावांत मेळावे!
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत एकूण १४१ पीक कर्ज मेळावे घेण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यांत १५ ते २५ गावांमध्ये पीक कर्ज मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.

 

Web Title: Akola district will start a crop loan program from Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.