प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मूल्यमापन चाचणीचा बट्टय़ाबोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:20 AM2017-11-11T01:20:42+5:302017-11-11T01:21:37+5:30

अकोला : शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी प्रगत  शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे; परंतु  या उपक्रमाचा शासनाच्या शिक्षण विभागाकडून बट्टय़ाबोळ सुरू आहे.  

Advanced Education for Assessment of Assessment in Maharashtra! | प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मूल्यमापन चाचणीचा बट्टय़ाबोळ!

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मूल्यमापन चाचणीचा बट्टय़ाबोळ!

Next
ठळक मुद्दे६0 गुणांऐवजी इंग्रजीचा ५0 गुणांचा पेपर 

नितीन गव्हाळे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी प्रगत  शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे; परंतु  या उपक्रमाचा शासनाच्या शिक्षण विभागाकडून बट्टय़ाबोळ सुरू आहे.  शुक्रवारी संकलित मूल्यमापन चाचणी अंतर्गत इंग्रजी विषयाचा पेपर ६0  गुणांचा असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र अकोल्या तील शाळांमधील विद्यार्थ्यांना ५0 गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे  शिक्षक संभ्रमात पडले. ६0 गुणांची प्रश्नपत्रिका ५0 गुणांची कशी देण्यात  आली, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. 
विद्या प्राधिकरणातर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गुरुवारपासून ८ ते ११  नोव्हेंबर या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ घेण्यात  येत आहे. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची चाचणी  शुक्रवारी घेण्यात आली. या विषयासाठी ६0 गुणांचा लेखी पेपर घेण्यात  येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यात  ५0 गुणांची लेखी परीक्षा आणि १0 गुणांची तोंडी परीक्षा अशी मिळून ६0  गुणांचा पेपर व्हायला हवा होता; मात्र प्रत्यक्षात इंग्रजी विषयाचा पेपर लेखी  व तोंडी मिळून ५0 गुणांचाच देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणदान  कसे करावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिक्षकांच्या चुका  शोधण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविणार्‍या शिक्षण विभागाच्या  अधिकार्‍यांना प्रश्नपत्रिकेमधील गुणांबाबतची एवढी गंभीर चूक लक्षात  येऊ नये, असा प्रश्न शिक्षक व विद्यार्थ्यांना पडला आहे. नियमाप्रमाणे ६0  गुणांचा असणारा इंग्रजीचा पेपर ५0 गुणांचा असल्याचे पाहून शिक्षक व  विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. १0 गुणांची तोंडी परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात  येणार होती; परंतु तोंडी परीक्षेचे गुण याच मूल्यमापन चाचणीच्या प्रश्न पत्रिकेत गृहीत धरण्यात येणार असल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.  संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सातत्याने चुका  आढळून येत असल्याने, शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांंना गुणदान करताना  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चुकांची जबाबदारी कोणी घेईल का,  असा प्रश्नही शिक्षकांनी उपस्थित केला आहे. 

चुका करणार्‍या विद्या प्राधिकरणावर कारवाई होईल का?
एकीकडे शिक्षकांवर शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर वेतनवाढ देण्याचा  विचार शासन करीत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत  शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमा अंतर्गत मूल्यमापन, पायाभूत चाचणी घेण्यात  येत आहे आणि त्यातील प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर चुका करण्यात येत आहे.  प्रश्नपत्रिका तयार करणार्‍या विद्या प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांवर शिक्षण  विभागाचे अधिकारी कारवाई करतील का, असा प्रश्न राज्य खासगी प्रा थमिक शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष गावंडे यांनी केला आहे.

Web Title: Advanced Education for Assessment of Assessment in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.