लोकअदालतमध्ये ४८९ प्रकरणे निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:17 PM2019-07-14T14:17:02+5:302019-07-14T14:17:14+5:30

जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह इतरही न्यायालयांमधील एकूण ५ हजार ९९३९ प्रलंबित प्रकरणांपैकी ४८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

489 cases in Lok Adalat | लोकअदालतमध्ये ४८९ प्रकरणे निकाली!

लोकअदालतमध्ये ४८९ प्रकरणे निकाली!

Next

अकोला: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, १३ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह इतरही न्यायालयांमधील एकूण ५ हजार ९९३९ प्रलंबित प्रकरणांपैकी ४८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
शनिवारी दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक आणि औद्योगिक न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. लोकअदालतमध्ये भारत संचार निगमसह विविध बँकांची एकूण दाखलपूर्व २ हजार ५८६ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९२ प्रकरणांमध्ये ४१ लाख ४३ हजार ४३ रुपयांवर तडजोड करण्यात आली. यासोबतच तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या ३ हजार ३५३ प्रकरणे सुनावणीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३९७ प्रकरणांमध्ये ४ कोटी २७ लाख ७२ हजार ९७0 रुपयांवर तडजोड करण्यात आली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे, सचिव स्वरूप बोस यांच्या मार्गदर्शनात न्यायालय प्रबंधक ए. एस. लव्हाळे, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक राजेंद्र निकुंभ, श्रीहरी टाकळीकर, व्ही. आर. पोहरे, कुणाल पांडे व शाहबाज खान यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: 489 cases in Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.