अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 01:19 PM2019-07-08T13:19:42+5:302019-07-08T13:20:36+5:30

अकोला: अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ३०० भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमध्येच रोखण्यात आले आहे.

25 people from Akola, who went to Amarnath Yatra, stopped in Srinagar | अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले

अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले

Next

अकोला: अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ३०० भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमध्येच रोखण्यात आले आहे. त्यात अकोल्यातील २५ जणांचा समावेश असून हे सर्व भाविक सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अकोल्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रयत्नानंतर या सर्व भाविकांना कडक सुरक्षा बंदोबस्तात श्रीनगर विमानतळाकडे रवाना करण्यात आले आहे.
१ जुलैपासून ४५ दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. त्यासाठी देशभरातील भाविक श्रीनगरमध्ये दाखल होतात. आतपर्यंत ८१ हजार भाविकांनी बाबा बफार्नीचं दर्शन घेतलं आहे. दरवर्षी प्रमाणे यावषीर्ही अमरनाथ यात्रेवर अतिरेक्यांचा हल्ला होण्याची शक्यता असल्याने श्रीगनरमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
श्रीनगर एअरपोर्टलाही सुरक्षेचा वेढा पडला आहे. मात्र कालपासून श्रीनगरमध्ये तणाव निर्माण झाल्याने ३०० भाविकांना श्रीनगरमध्येच रोखण्यात आलं आहे. या भाविकांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या भाविकांमध्ये अकोल्याचे २५ जण असून हे सर्व भाविक सुरक्षित असल्याचं सूत्रांनी सांगितले.

Web Title: 25 people from Akola, who went to Amarnath Yatra, stopped in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.