अकोला जिल्ह्यातील २७८९ गारपीटग्रस्तांसाठी २.२२ कोटींची मदत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:25 AM2018-03-06T01:25:31+5:302018-03-06T01:25:31+5:30

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकºयांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे.

2.22 crores sanctioned for 2789 hailstorms affected in Akola district | अकोला जिल्ह्यातील २७८९ गारपीटग्रस्तांसाठी २.२२ कोटींची मदत मंजूर

अकोला जिल्ह्यातील २७८९ गारपीटग्रस्तांसाठी २.२२ कोटींची मदत मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्दे१८६० हेक्टरवरील पिकांचे झाले होते नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकºयांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे.
 गत ११ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अवकाळी पावसासह गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आल्यानंतर पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. 
त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकºयांचे १ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे.  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील गारपीटग्रस्त २ हजार ७८९ शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रुपये, बागायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टर १३ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला मदत निधी उपलब्ध झाल्यानंतर मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

पिकांचे नुकसान आणि अशी आहे मंजूर मदत!
जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेल्या ८५० हेक्टर २० आर क्षेत्रावरील पीक नुकसान भरपाईपोटी ५७ लाख ८१ हजार ३६० रुपये, ४४३ हेक्टर ६३ आर बागायत क्षेत्रावरील पीक नुकसान भरपाईपोटी ६२ लाख ६० हजार ३५५ रुपये आणि ५६६ हेक्टर ३७ आर क्षेत्रावरील फळ पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १ कोटी १ लाख ३४ हजार ६६० रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

Web Title: 2.22 crores sanctioned for 2789 hailstorms affected in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.