अनाथ १८३ मुला-मुलींना मदतीचे ‘कवच’ : दरमहा ६00 रुपयांचे अनुदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:51 AM2018-01-29T01:51:00+5:302018-01-29T01:51:14+5:30

अकोला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या १८ वर्षाआतील जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपये अनुदानाच्या मदतीचे ‘कवच ’ देण्यात आले आहे.

183 boys and girls '' armor '' for the orphan: A grant of Rs 600 per month! | अनाथ १८३ मुला-मुलींना मदतीचे ‘कवच’ : दरमहा ६00 रुपयांचे अनुदान!

अनाथ १८३ मुला-मुलींना मदतीचे ‘कवच’ : दरमहा ६00 रुपयांचे अनुदान!

Next
ठळक मुद्देअनुदान तोकडे; उपजीविकेचा प्रश्न!

संतोष येलकर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या १८ वर्षाआतील जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपये अनुदानाच्या मदतीचे ‘कवच ’ देण्यात आले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आई-वडील नसलेल्या १८ वर्षाआतील अनाथ मुले व मुलींनी दमहा ६00 रुपये अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील सातही तालुक्यात आई-वडील नसल्याने नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे राहणारी १८३ अनाथ मुले-मुली आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत या अनाथ मुला-मुलींची संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निवड करण्यात आली असून, दरमहा प्रत्येकी ६00 रुपयांच्या अनुदानाची रक्कम अनाथ मुले -मुलींच्या बँक खात्यात जमा केली आहे. 
शासनाच्या योजनेत दरमहा ६00 रुपयांची मिळणारी  मदत  जिल्ह्यातील अनाथ १८३ मुला-मुलींना दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आधार ठरत आहे.  

अनुदान तोकडे; उपजीविकेचा प्रश्न!
आई-वडील नसलेल्या मुले-मुलींना संजय निराधार योजनेंतर्गत दरमहा ६00 रुपयांचे अनुदान शासनामार्फत देण्यात येते; मात्र महागाईच्या काळात महिनाभरात उपजीविका करण्यासाठी देण्यात येणारे अनुदान अत्यंत तोकडे आहे. त्यामुळे मिळणार्‍या अनुदानाच्या ६00 रुपयांत उपजीविका कशी करणार, असा प्रश्न अनाथ मुले-मुलींना सतावणारा आहे.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यात आई-वडील नसलेल्या अनाथ १८३ मुला-मुलींना दरमहा ६00 रुपयांप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम दरमहा संबंधित अनाथ मुला-मुलींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
- पी.व्ही. गिरी
तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना), 
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.

Web Title: 183 boys and girls '' armor '' for the orphan: A grant of Rs 600 per month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.