पाणी योजनेसाठी देवळालीच्या एक्सप्रेस फिडरचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:50 AM2018-03-23T11:50:00+5:302018-03-23T11:50:00+5:30

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महावितरणने २०११-१२ मध्ये मंजूर केलेल्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस फिडरसाठी २७ लाख ४२ हजार रूपये जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झाल्यामुळे योजनेतील अडथळा दूर झाला आहे.

For the water scheme, open the path of Deodhali Express Feeder | पाणी योजनेसाठी देवळालीच्या एक्सप्रेस फिडरचा मार्ग मोकळा

पाणी योजनेसाठी देवळालीच्या एक्सप्रेस फिडरचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देजिल्हा नियोजनमधून २७ लाख रूपये मंजूर

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महावितरणने २०११-१२ मध्ये मंजूर केलेल्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस फिडरसाठी २७ लाख ४२ हजार रूपये जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झाल्यामुळे योजनेतील अडथळा दूर झाला आहे.
महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत देवळाली प्रवरा पालिकेस १ कोटी २५ लाख रूपये मिळाले होते. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने २०११-१२ मध्ये प्रशासकीय मंजुरी दिली. याच निधीमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या एक्सप्रेस फिडरसाठी २० लाखांच्या निधीची तरतूद केली होती. २०११ मध्येच मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था बरखास्त होऊन तिचे कार्यक्षेत्र महावितरणने अधिग्रहण केल्याने एक्स्प्रेस फिडरचे अंदाजपत्रक बदलले. महावितरणने ४७ लाख ४२ हजार रूपयांचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले. त्यामुळे पूर्वीच्या अंदाजपत्रकात २७ लाख ४२ हजार रूपयांची तफावत पडली होती. त्यामुळे पालिकेच्या तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करून देखील ही योजना पूर्णत्वास नेता आली नाही. दीड वर्षांपूर्वी नगराध्यक्ष सत्यजित कदम व त्यांच्या सहकाºयांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार बावनकुळे यांनी पालकमंत्री शिंदे यांना नाविन्यपूर्ण योजनेंंतर्गत २७ लाख ४२ हजार रूपये एवढी फरकाची रक्कम जिल्हा नियोजन निधीतून देण्याचे आदेश दिले.
त्यानुसार ६ जानेवारीस जिल्हा नियोजन समितीने हा मंजूर करून २० फेब्रुवारीस पालिकेस अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले. पालिकेने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून अंदाजपत्रक तयार करून १२ मार्चला जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी १६ मार्चला नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पालिकेस २७ लाख ४२ हजार रूपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसाठी एक्सप्रेस फिडर वापरणारी देवळाली प्रवरा ही अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच नगरपालिका असणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी योजनेच्या पाणी योजनेचा वीज प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

 

Web Title: For the water scheme, open the path of Deodhali Express Feeder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.