आदिक, मुरकुटे, चित्ते यांच्यात एकमत होईना

By admin | Published: October 19, 2016 12:42 AM2016-10-19T00:42:41+5:302016-10-19T01:04:09+5:30

श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपालिकेत कॉँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले असताना

Unity between Adik, Murkuts and Chite | आदिक, मुरकुटे, चित्ते यांच्यात एकमत होईना

आदिक, मुरकुटे, चित्ते यांच्यात एकमत होईना

Next


श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपालिकेत कॉँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले असताना विरोधकांमध्ये मात्र अजूनही उमेदवारीबाबत एकमत होत नाही. अनुराधा आदिक, मंजुश्री मुरकुटे व दीपाली चित्ते यांच्यात उमेदवारीवरून एकमत होत नाही. मुरकुटे व चित्ते दोघेही उमेदवारीवर ठाम असल्याने नगराध्यक्षपदाचा तिढा कसा सुटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ससाणेविरोधक नगरपालिका निवडणुकीत एकवटतात. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. राजश्री ससाणे यांची कॉँग्रेसकडून उमेदवारी निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार भानुदास मुरकुटे हे स्नुषा मंजुश्री यांच्यासाठी आग्रही आहेत. भाजपचे जिल्हा संघटक प्रकाश चित्ते हेही त्यांच्या पत्नी दीपाली यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांचेही नाव नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अग्रभागी आहे.
गत विधानसभा निवडणुकीत शहरातील अनेक बूथवर राष्ट्रवादीपेक्षा भाजप आघाडीवर होते, त्यामुळे नगराध्यक्षपदाची संधी भाजपला मिळावी, असा मतप्रवाह भाजपात आहे. दुसरीकडे ससाणे विरुद्ध मुरकुटे पारंपरिक अशी सरळ लढत होण्यासाठी मुरकुटे जोर लावून आहेत. चित्ते यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला मुरकुटे यांचा विरोध आहे. महाविकास आघाडी होऊन चित्ते यांना उमेदवारी द्यावी यासाठी ससाणे विरोधक मुरकुटे यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुराधा आदिक यांचा सर्वस्वी निर्णय हा अविनाश आदिक यांच्यावर आहे. अविनाश आदिक यांनी अजूनही उमेदवारीबाबत निर्णय घेतलेला नाही.
प्रदेश भाजपच्या बैठकीत सेनेसोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर देण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिली. भाजपला नगराध्यक्षपदाची संधी दिल्यास श्रीरामपूर पालिकेत भाजप-सेनेची युती होणे शक्य आहे. भाजप त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे समजते. सेनेकडून मात्र यावर कोणी काहीच प्रतिक्रिया देत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Unity between Adik, Murkuts and Chite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.