तृप्ती तुपे खून प्रकरणात आणखी तिघांचा समावेश

By admin | Published: August 26, 2014 11:15 PM2014-08-26T23:15:58+5:302014-08-26T23:22:13+5:30

पारनेर : तृप्ती तुपे हिचा खून करणाऱ्या संतोष विष्णू लोणकर (वय ३२) याच्याबरोबर आणखी दोघा जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

The triple murder case of Tripti Tupa murder involved three people | तृप्ती तुपे खून प्रकरणात आणखी तिघांचा समावेश

तृप्ती तुपे खून प्रकरणात आणखी तिघांचा समावेश

Next

पारनेर : अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील दहावीतील विद्यार्थीनी व लोणी मावळा येथील रहिवासी तृप्ती तुपे हिचा खून करणाऱ्या संतोष विष्णू लोणकर (वय ३२) याच्याबरोबर आणखी दोघा जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या दोघांनाही पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अळकुटी येथील साईनाथ विद्यालयात दहावीत शिक्षण घेणारी तृप्ती पोपट तुपे शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान लोणी मावळा येथील घरी जात होती. यावेळी कुकडी कालवा पोटचारीच्या पुलाखाली ओढून तिचा खून केल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन या घटनेचा निषेध करीत तपास लवकर लावा अन्यथा आमच्या पहिलीपासून पदवी पर्यंतच्या मुलींचे शाळा बंद आंदोलन करू, असा इशारा दिला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, पोलीस उपअधीक्षक वाय. डी.पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी विशेष पोलिस पथके तैनात करून सर्व बाजुंनी तपासाची सूत्रे हलविल्यानंतर संतोष विष्णू लोणकर याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. मात्र यामध्ये आणखी काही लोकांचा सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संशय होता. त्यामाध्यमातुन पोलिसांनी पुन्हा तपास केल्यानंतर लोणी मावळा येथीलच दोन तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील दोघांचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
(तालुका प्रतिनिधी)
बहिष्कार मागे
तृप्ती तुपे हिच्या खुनाचे मारेकरी सापडेपर्यंत गावातील पहिली ते पदवी पर्यंतच्या मुलींना शाळेत न पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी मंगळवारी मागे घेतला. सोमवारी शाळेवर बहिष्कार टाकणाऱ्या मुलींना मंगळवार पासुन शाळेत जाण्यास सुरवात केली आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व गावातील संस्थेची माध्यमिक शाळा आहे. तेथेही मुलींची उपस्थिती आज होती. तर गावातून दुसरीकडे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींनीही आपले दैनंदिन काम सुरू केले आहे.

Web Title: The triple murder case of Tripti Tupa murder involved three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.