समृद्धी महामार्गावरील अपघातात जालना जिल्ह्यातील तिघे ठार

By सचिन धर्मापुरीकर | Published: February 10, 2024 08:17 AM2024-02-10T08:17:23+5:302024-02-10T08:17:53+5:30

कोपरगाव तालुक्यातील घटना: साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते शिर्डीला

Three killed in Jalna district accident on Samriddhi highway | समृद्धी महामार्गावरील अपघातात जालना जिल्ह्यातील तिघे ठार

समृद्धी महामार्गावरील अपघातात जालना जिल्ह्यातील तिघे ठार

सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव ( जि. अहमदनगर) : कोपरागाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गांवर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार, तर दोन जर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.9 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.

राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठने ( तिघेही राहणार जाफराबाद जिल्हा जालना) अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात फलके व वाघ हे दोघे जखमी झाले असून त्यांची पूर्ण नावे कळू शकली नाही. त्यांना वैजापूर येथे हलविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा असताना त्यातील चैनल खाली पडलेला होता, हा चॅनल कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डी कडे स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने येत होती. स्विफ्ट डिझायर कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेला कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनर वर जाऊन आदळली . यां अपघातात कार चक्काचूर झाली .यां अपघातात वरील तीन जणांनाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी असून त्याला उपचारासाठी वैजापूर येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व  तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया रात्री उशिरा सुरू होती.

 

Web Title: Three killed in Jalna district accident on Samriddhi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.