लेकीचा जीव वाचविण्यासाठी आई-वडीलांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:51 PM2018-11-29T13:51:17+5:302018-11-29T13:51:22+5:30

लेकीचा जीव वाचविण्यासाठी आई-वडीलांचा संघर्ष करत आहेत.

The struggle of the mother-father to save Leki's life | लेकीचा जीव वाचविण्यासाठी आई-वडीलांचा संघर्ष

लेकीचा जीव वाचविण्यासाठी आई-वडीलांचा संघर्ष

Next

श्रीगोंदा : लेकीचा जीव वाचविण्यासाठी आई-वडीलांचा संघर्ष करत आहेत. हिरडगाव येथील रमेश पवार या शेतमजुराची मुलगी पायल कर्करोगाने पिडीत असून तिच्या वडीलांनी मुंबईत फुटपाथ राहून आपल्या लाडक्या लेकीचा जीव वाचविण्यासाठी झुंज सुरु आहे.
रमेश पवार यांना एक मुलगा आणि एक मुलगी. पायल ही हिरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. अतिशय हुशार मुलगी पण गेल्या काही दिवसापासून तिला कर्करोगाने ग्रासले आहे. भाकरीसाठी संघर्ष करणा-या पवार कुंटूबासमोर मोठे संकट ओढवले. पायलच्या आईने पैशांसाठी नातेवाईकांकडे भटकंती केल. कर्ज काढले सुमारे तीन लाख जमा केले आणि उपचार केले. काही चाचण्या पूर्ण केल्या. आणखी दोन चाचण्या करणे आवश्यक आहेत. जवळील पैसा संपला आहे. एका बाजूला पहिले कर्ज आणि दुस-या बाजूला उपचारासाठी पैसे नाहीत. म्हणून उपचार करणे थांबले आहे. त्यामुळे पायलची पुन्हा कर्करोगाशी झुंज सुरू झाली आहे.सामाजिक जाणिवेतून पवार कुंटूबाला मदतीचा हात दिला तर पायलचा जीव वाचू शकतो.
 

Web Title: The struggle of the mother-father to save Leki's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.