राज्यातील पहिला अद्भूत प्रकल्प राहुरीत साकारणार; सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:49 PM2017-11-25T14:49:00+5:302017-11-25T15:00:48+5:30

या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

State's first tremendous project will come out alive; Government Approval | राज्यातील पहिला अद्भूत प्रकल्प राहुरीत साकारणार; सरकारची मंजुरी

राज्यातील पहिला अद्भूत प्रकल्प राहुरीत साकारणार; सरकारची मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देबेघरांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व सोयीसुविधांनीयुक्त असणारा राज्यातील पहिला भव्य गृहप्रकल्प राहुरीत साकारणार आहे.दोन एकरापेक्षा जास्त जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामध्ये २१० घरे बांधण्यात येणार आहेत.तीनशे स्क्वेअरफुट बांधकाम असलेल्या घरामध्ये दोन रुम असतील. प्रत्येक लाभार्थीसाठी तीन लाख रूपये खर्च येणार आहे. त्यामध्ये ५० हजार रूपये लाभार्थिंनी भरावयाचे आहेत.

राहुरी : बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व सोयीसुविधांनीयुक्त असणारा राज्यातील पहिला भव्य गृहप्रकल्प राहुरीत साकारणार आहे. दोन एकरापेक्षा जास्त जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामध्ये २१० घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात वसाहत उभी रहावी, अशी युवकांची मागणी होती़ त्यानुसार तत्कालीन नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी राहुुुुरी नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. नगर परिषदेने प्रकल्पाचा आराखडा शहर नियोजन विभागाकडे पाठविला होता. इंजिनिअर प्रमोद कर्डिले व मोटे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला.
रमाई आवासा योजनेतून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सर्व्हे नंबर ४२२ मध्ये तीन मजली इमारतीमध्ये २१० घरे बांधणार असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे यांनी सांगितले. तीनशे स्क्वेअरफुट बांधकाम असलेल्या घरामध्ये दोन रुम असतील. एक रेशनकार्ड धारकाला एक घर देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक लाभार्थीसाठी तीन लाख रूपये खर्च येणार आहे. त्यामध्ये ५० हजार रूपये लाभार्थिंनी भरावयाचे आहेत. नियोजित वसाहतीमुळे अरूंद रस्ते असलेल्या लक्ष्मीनगर भागातील नागरीकांना हक्काचे घर मिळणार आहे, असे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी सांगितले.
बहुमजली इमारतीसाठी शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचा नगरसेवक सोन्याबापू जगधने, प्रकाश जगधने, ज्ञानेश्वर जगधने यांनी सत्कार केला़ यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, नगरसेवक भिकूशेठ भुजाडी, अशोक आहेर, अनिल कासार, नंदकुमार तनपुरे, रमेश चौधरी, रावसाहेब तनपुरे, बाळासाहेब उन्डे आदी उपस्थित होते.

Web Title: State's first tremendous project will come out alive; Government Approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.