सामाजिक सलोखा हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:37 AM2019-05-02T11:37:39+5:302019-05-02T11:37:54+5:30

सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

The specialty of the district is social reconciliation: Ram Shinde | सामाजिक सलोखा हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य : राम शिंदे

सामाजिक सलोखा हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य : राम शिंदे

Next

अहमदनगर : सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर झाला. त्यानंतर केलेल्या भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. पालकमंत्री शिंदे म्हणाले, आपला जिल्हा हा संतांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. हा वारसा आणि परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी परेड कमांडर परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने शानदान संचलन केले. सूत्रसंचलन गीतांजली भावे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उप विभागीय अधिकारी उज्वला गाडेकर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

Web Title: The specialty of the district is social reconciliation: Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.