शेतक-यांना हाय होल्टेजचा शॉक : महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:10 PM2018-09-20T12:10:02+5:302018-09-20T13:29:19+5:30

नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील शेतक-यांना गेल्या महिनाभरात हाय होल्टेजचा फटका बसत असून त्याकडे महावितरणचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत.

Shock of High Holt: Farmers' neglect of MSEDCL | शेतक-यांना हाय होल्टेजचा शॉक : महावितरणचे दुर्लक्ष

शेतक-यांना हाय होल्टेजचा शॉक : महावितरणचे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्दे राळेगणमधील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारानुकसानभरपाईची मागणीउपकरणांचे कव्हरही मारतात शॉकहाय होल्टेजमुळे जळतात उपकरणे

अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील शेतक-यांना गेल्या महिनाभरात हाय होल्टेजचा फटका बसत असून त्याकडे महावितरणचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी उपकरणांसह आंदोलनाचा इशारा दिला आहे. उपसरपंच सुधीर भापकर यांनी गावाला पूर्णवेळ वायरमन देण्याची मागणी केली.  
नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा गावातील आरखुरी ट्रान्सफार्मरवर विद्युत पंप, तसेच घरगुती वापरासाठी लाईटचा पुरवठा होतो. रूईछत्तीसी येथील उपकेंद्राअंतर्गत राळेगण म्हसोबा येथील महावितरणचा कारभार चालतो. आरखुरी डीपीवर जवळपास ५० ते ६० घरांना विद्युतपुरवठा होतो. तसेच विद्युत पंपानाही पुरवठा केला जातो. अनेक वेळा डिपीमध्ये बिघाड झाल्यानंतर नागरिक वायरमनशी संपर्क करतात, मात्र वायरमन दखल घेत नाही. तक्रार करुनही गेल्या महिन्याभरापासून सातत्याने हाय होल्टेज येत आहे. दोन तारांवर हाय होल्टेज येत असून यामुळे घरातील उपकरणे नादुरुस्त होत आहेत. काही क्षणात विद्युत उपकरणे जळून खाक होत आहेत. यामध्ये मोबाईल चार्जर, साधे बल्ब, एलईडी, टीव्ही, फ्रीज यासह विविध उपकरणे जळत आहेत. गेल्या महिन्याभरात या भागातील ५० ते ६० घरातील नागरिकांना जवळपास १ लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. संतप्त नागरिक रुईछत्तीसी येथील उपकेंद्रासमोर उपकरणांसह आंदोलन करण्याच्या इशारा नागरिकांनी दिली आहे. 
माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष डावखरे, ग्रामपंचायत सदस्य भरत हराळ, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ खराडे, बाजीराव हराळ, संदिप थोरात, अजिनाथ हराळ, भाऊसाहेब हराळ, दीपक हराळ, संदिप हराळ, मेघराज कोतकर, लक्ष्मण हराळ, दत्तात्रय खराडे, मकरंद पिपळे यांच्यासह ग्रामस्थांनी मागणी केली आहे. 
पूर्णवेळ वायरमन द्यावा
राळेगणमधील हा प्रकार संतापजनक आहे. महावितरणही याकडे लक्ष देत नाही. अनेक दिवसांपासून राळेगणला पूर्णवेळ वायरमन नाही. त्यामुळे विजेची दुरुस्ती नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालून करतात. उपकेंद्राशी संपर्क करुनही समस्येचे निराकरण होत नाही. त्यामुळे राळेगणला पूर्णवेळ वायरमन द्यावा. -सुधीर भापकर, उपसरपंच 

हराळमळा व आरखुरीची सिंगल फेज योजना धूळखात
राळेगण म्हसोबा येथील हराळमळा व आरखुरीसाठी सिंगल फेज योजनेसाठी मागणी करण्यात आली आहे. तसेच गेल्या ४ ते ५ वर्षापासून आरखुरी परिसरातील नागरीकांनी घरगुती कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केले आहेत. तसेच घरगुती वापरासाठी स्वतंत्र डीपीची मागणीही सातत्याने केली जात आहे. मात्र महावितरण प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

उपकरणांचे कव्हरही मारतात शॉक
गेल्या महिन्याभरापासून सातत्याने हाय होल्टेज येत आहे. त्यामुळे घरातील उपकरणे सातत्याने खराब होत आहेत. हाय होल्टेजमुळे उपकरणांच्या कव्हरही शॉक मारत आहेत. त्यामुळे धोेका वाढलेला आहे. होल्टेजमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. महावितरणने त्वरित दुरुस्ती करावी. - दीपक हराळ, नागरिक

हाय होल्टेजमुळे जळतात उपकरणे
घरातील उपकरणे दुरुस्तीसाठी मी जात आहे. हा सर्व प्रकार हाय होल्टेजमुळे होत आहे. जळालेली उपकरणे सहजासहजी दुरुस्त होत नाहीत. हा प्रकार गंभीर असून तात्काळ दुरस्ती करण्याची गरज आहे. - प्रविण मदने, इलेक्ट्रिशियन

हा प्रकार गंभीर
राळेगण म्हसोबा येथील आरखुरी डीपीचा प्रकार गंभीर आहे. त्वरीत वायरमनला पाठवले जाईल. - केतन देवरे, उपकेंद्र प्रमुख, महावितरण, रूईछत्तीसी (नगर तालुका)

Web Title: Shock of High Holt: Farmers' neglect of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.