सायकलिंगमध्ये नगरला तिस-यांदा शिवछत्रपती पुरस्कार : रवींद्र करांडेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:20 AM2019-02-14T11:20:13+5:302019-02-14T11:20:17+5:30

भारतीय सैन्य दलातील हवालदार व नगर तालुक्यातील दरेवाडी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र करांडे यांना सायकलिंग क्रीडा प्रकारात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे़

Shiva Chhatrapati Award for Cycling in the City for third time: Ravindra Karande's Pride | सायकलिंगमध्ये नगरला तिस-यांदा शिवछत्रपती पुरस्कार : रवींद्र करांडेचा गौरव

सायकलिंगमध्ये नगरला तिस-यांदा शिवछत्रपती पुरस्कार : रवींद्र करांडेचा गौरव

Next

अहमदनगर : भारतीय सैन्य दलातील हवालदार व नगर तालुक्यातील दरेवाडी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र करांडे यांना सायकलिंग क्रीडा प्रकारात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे़ त्यामुळे सायकलिंगमध्ये तिस-यांदा नगरला शिवछत्रपती पुरस्कार लाभला आहे़
रवींद्र करांडे हे २००९-१० मध्ये विद्यापीठ संघाकडून नगरचे प्रतिनिधीत्व करीत होते़ सर्वसामान्य परिस्थिती असलेले करांडे हे त्यानंतर भारतीय सैन्य दलात रुजू झाले़ त्यानंतरही त्यांनी खेळ सुरुच ठेवला़ सैन्याकडून खेळताना करांडे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारली़ २०१५ मध्ये करांडे यांनी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या वर्ल्ड मिलिटरी स्पर्धेत सहभाग घेतला होता़
२०१६ मध्ये राष्ट्रीय रोड सायकलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक पटकावले़ तर २०१७ मध्ये झालेल्या एशियन रोड सायकलिंग स्पर्धेत करांडे यांनी सहभाग घेतला होता़ त्याशिवाय राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत २०१२ मध्ये रौप्य, २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५-१६ मध्ये कांस्य पदक पटकावले आहे़ त्यांच्या या कामगिरीची दखल घेत सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केला आहे़ मागील वर्षी नेवासा येथील सायकलपटू गणेश
पवार यांनाही सायकलिंगमध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ तसेच सतीश झेंडे यांनाही यापूर्वी सायकलिंगमध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे़ त्यामुळे करांडे यांच्या रुपाने नगरला सायकलिंगमध्ये तिसºयांदा शिवछत्रपती पुरस्कार लाभला आहे़

Web Title: Shiva Chhatrapati Award for Cycling in the City for third time: Ravindra Karande's Pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.