शिर्डी व श्रीरामपूरात मातंग समाजाचे उमेदवार : मधुकर कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 06:17 PM2018-09-12T18:17:22+5:302018-09-12T18:17:26+5:30

आपण भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक निवड समितीत असल्याने देशात आगामी निवडणुकीत लोकसभेच्या ३ तर महाराष्टÑात विधानसभेच्या ११ जागा मातंग समाजास मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Shirdi and Shrirampurat Mathang community candidates: Madhukar Kamble | शिर्डी व श्रीरामपूरात मातंग समाजाचे उमेदवार : मधुकर कांबळे

शिर्डी व श्रीरामपूरात मातंग समाजाचे उमेदवार : मधुकर कांबळे

googlenewsNext

शिर्डी : आपण भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक निवड समितीत असल्याने देशात आगामी निवडणुकीत लोकसभेच्या ३ तर महाराष्टÑात विधानसभेच्या ११ जागा मातंग समाजास मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राखीव शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात देखील मातंग समाजाचेच उमेदवार असतील, असे सूतोवाच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राखीव मतदार संघांची चाचपणी करण्यासाठी कांबळे हे मंगळवारी शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या ते बोलत होते.
कांबळे म्हणाले, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात केवळ राजकारणासाठी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा वापर झाला. कॉंग्रेस-राष्टÑवादीला कधी अण्णा भाऊ साठेंची आठवण झाली नाही. मात्र राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईस्थित अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्टÑीय स्मारकास तत्वत: मान्यता देऊन ३५० कोटींचा निधी मंजुर केल्याचे कांबळे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मंगेश त्रिभुवन, विनोद राक्षे, सूनील उमाप, मंजाबापू साळवे, निलेश सरोदे, नितीन दिनकर, राजेंद्र त्रिभुवन, प्रसाद ोते यांची मनोगते झाली. सूत्रसंचालन साळवे यांनी केले. रामभाऊ पिंगळे यांनी आभार मानले. बैठकीस मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

 

 

 

Web Title: Shirdi and Shrirampurat Mathang community candidates: Madhukar Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.