दूरगाव तलावातून वीज पंप जप्त

By admin | Published: July 2, 2014 12:42 AM2014-07-02T00:42:37+5:302014-07-02T01:00:40+5:30

कुळधरण : कर्जत तालुक्यातील दूरगाव तलावातून अनधिकृतरित्या शेतीसाठी पाणी उपसा करणारे तेवीस वीजपंप प्रशासनाने जप्त केले आहेत.

Seized power pump from Telgaon lake | दूरगाव तलावातून वीज पंप जप्त

दूरगाव तलावातून वीज पंप जप्त

Next

कुळधरण : कर्जत तालुक्यातील दूरगाव तलावातून अनधिकृतरित्या शेतीसाठी पाणी उपसा करणारे तेवीस वीजपंप प्रशासनाने जप्त केले आहेत.
तलावातून होत असलेल्या अनधिकृतरित्या पाणी उपशासंदर्भातचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द (३० जून) होताच सिंचन विभागाने तात्काळ ठोस कारवाई सुरू केली. या कारवाईत दूरगाव तलावातील अठरा तसेच थेरवडी तलावातील पाच वीज पंप जप्त करण्यात आले.
पाणी साठे राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदारांचे आदेश असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेले पाण्याचे स्त्रोत उपसल्याने तलावात दहा टक्केच पाणी शिल्लक आहे.
आदेशाचे पालन न केल्याने अखेर कुळधरणचे शाखा अभियंता संभाजी दरेकर यांनी दूरगाव तसेच थेरवडी तलावात वीज पंप जप्तीची कारवाई केली. थेरवडी तलावात शेतकऱ्यांनी पानबुडी वीज पंपाची केबल तोडून पाण्यात टाकत वीज पंप दडवण्याचा प्रयत्न केल्याने कारवाईत अडथळे येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण तेवीस वीज पंप ताब्यात घेण्यात आले.
(वार्ताहर)
पोलिसांची निष्क्रियता
शाखा अभियंता दरेकर यांनी यापूर्वी कारवाईचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कारवाई होऊ दिली नाही. दरेकर यांनी तात्काळ कर्जत पोलिसांत तक्रार करून पोलीस संरक्षण मागितले, मात्र त्यांना संरक्षण मिळाले नाही. सोमवारच्या कारवाईतही पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली, मात्र मोर्चाचे कारण पुढे करुन संरक्षण देण्यास नकार देण्यात आला.
पंप तहसीलमध्ये
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अनधिकृत पाणी उपशावर वीज पंप जप्तीची कारवाई करण्यात आली. सिंचन विभागाने कारवाई केली असलीतरी वीज पंप तहसीलमध्ये जमा करण्यात येतील.
-यादव खताळ
कार्यकारी अभियंता, श्रीगोंदा

Web Title: Seized power pump from Telgaon lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.