राठोडांना उमेदवारी, गाडेंचे काय?

By admin | Published: July 2, 2014 12:40 AM2014-07-02T00:40:06+5:302014-07-02T00:40:06+5:30

अहमदनगर : शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेच्या तिकीटाची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे शहर शिवसेनेमध्ये चैतन्य उसळले आहे.

Rathore's candidature, what about the trains? | राठोडांना उमेदवारी, गाडेंचे काय?

राठोडांना उमेदवारी, गाडेंचे काय?

Next

अहमदनगर : शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेच्या तिकीटाची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे शहर शिवसेनेमध्ये चैतन्य उसळले आहे. आमदार अनिल राठोड यांनाच उमेदवारी मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याने राठोड यांचे शिवालय सकाळपासूनच गजबजले होते. मात्र, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे काय होणार? असा सवालही उपस्थित झाला आहे.
विद्यमान आमदारांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे फर्मान ठाकरेंनी सोडले आहे. याशिवाय बाजूच्या मतदारसंघात कोण उमेदवार असावा, याबाबतही सूचना करण्याचे आदेश विद्यमान आमदारांना देण्यात आले आहेत. नगर शहरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून अनिल राठोड हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेचीही उमेदवारी राठोड यांनाच मिळणार याची खात्री होतीच. मात्र सेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नगरच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. तशी तयारीही त्यांनी केली आहे. याबाबत ठाकरे यांच्याकडे गाडे यांनी निवेदनही दिल्याची माहिती आहे. मात्र ठाकरे यांनी स्वत:च विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचे जाहीर केल्याने प्रा. गाडे यांच्या दाव्याचे काय?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रा. गाडे यांना नगरमध्ये उमेदवारी दिली जाणार नसल्याने त्यांचा मोर्चा आता श्रीगोंदा मतदारसंघाकडे वळणार असल्याची शक्यता व्यक्त आहे. (प्रतिनिधी)
उमेद्वारी मलाच मिळणार होती, याबाबत काहीच शंका नाही. शहराचा विकास आणि संरक्षणासाठी गेल्या २५ वर्षांपासून काम करीत असून शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. कितीही आॅफर आल्यातरी पक्ष सोडला नाही. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मलाच मिळणार होती, यात काही शंका बाळगण्याचे कारण नव्हते.
- अनिल राठोड, आमदार
उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना तिकीट देण्याची घोषणा केली, याबाबत आपल्याला माहिती नाही. सेनेला राज्यात संपूर्ण जागा लढवायच्या आहेत. भाजपाला चेकमेट करण्यासाठी विद्यमान आमदारांना तिकीट देण्याची घोषणा झाली असावी. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय बदलू शकतो. नगर विधानसभेवर माझा दावा कायम आहे. मात्र पक्ष जो आदेश देईल, तो मला शिरसावंद्य आहे.
- प्रा. शशिकांत गाडे
श्रीरामपूरची जबाबदारी
अनिल राठोड यांच्यावर श्रीरामपूर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांची चाचपणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीरामपूरमधून शिवसेनेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक
लहू कानडे, गत निवडणुकीत पराभूत झालेले सेनेचे उमेदवार भाऊसाहेब डोळस, आमदार बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांच्या नावाची चर्चा आहे. सेनेचे कार्यकर्ते अशोक थोरे चाचपणी करीत आहेत.

Web Title: Rathore's candidature, what about the trains?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.