राहुरीतील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्याचार करुन खून; मारेक-यांनी गाठली कौर्याची परीसीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 07:49 PM2017-11-15T19:49:51+5:302017-11-15T19:53:35+5:30

राहुरी तालुक्यातील गुहा येथील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (दि़ १५) सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Rahuri's Anganwadi helper tortures woman for murder; Marek's visit to Kourya's deadline | राहुरीतील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्याचार करुन खून; मारेक-यांनी गाठली कौर्याची परीसीमा

राहुरीतील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्याचार करुन खून; मारेक-यांनी गाठली कौर्याची परीसीमा

googlenewsNext

राहुरी : राहुरी तालुक्यातील गुहा येथील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (दि़ १५) सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मृृत अवस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव नंदा नामदेव वाघमारे (वय ४०) असे आहे़ गुहा येथे वस्ती अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून वाघमारे या काम करीत होत्या़ बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरात आढळून आला. राहुरी पोलीस ठाण्याला गावक-यांनी फोन करून माहिती दिली. राहुरी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर व डॉ. राजेंद्र वैरागर यांनी वैद्यकीय तपासणी केली. यात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागलेला आढळून आला आहे. तसेच गुप्तांगात माती व खडे आढळून आल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मयत महिला व संशयीत आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने मयत महिलेच्या डोक्यात जोरदार वार करुन तसेच तिच्या शरीरात काठीसदृश वस्तू घालून ठार केले असावे, असे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कसून चौकशी सुरु आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदार दिलीप राठोड हे पुढील तपास करीत आहे. बुधवारी सायंकाळी याबाबत संतोष तुपे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा दाखल केला आहे.

Web Title: Rahuri's Anganwadi helper tortures woman for murder; Marek's visit to Kourya's deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.