पोलिसांसमोरच सराफाने घेतले विष :चोरीचे सोने घेतल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 04:24 PM2018-08-01T16:24:02+5:302018-08-01T16:28:59+5:30

शहरातील सराफ व्यावसायिक गोरख दिगंबर मंडलिक (वय ५०) यांनी पोलिसांसमोरच दुकानात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .

Poisoned in front of police: accusations of stolen gold | पोलिसांसमोरच सराफाने घेतले विष :चोरीचे सोने घेतल्याचा आरोप

पोलिसांसमोरच सराफाने घेतले विष :चोरीचे सोने घेतल्याचा आरोप

googlenewsNext

श्रीरामपूर : शहरातील सराफ व्यावसायिक गोरख दिगंबर मंडलिक (वय ५०) यांनी पोलिसांसमोरच दुकानात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून संगमनेर पोलीस चौकशीसाठी आले असता बुधवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सराफ व्यावसायिकांनी बंद पाळत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
बुधवारी संगमनेर येथील काही पोलीस कर्मचारी मुंडलीक यांच्या दुकानात आले. त्यांनी चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप मुंडलीक यांच्यावर केला. त्याच वेळी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. व्यावसायिकांनी त्यांना तातडीने शहरातील साखर कामगार रुग्णालयात भरती केले. त्यांचीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजली.
दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून मुंडलीक यांना त्रास दिला जात होता असा आरोप व्यावसायिकांनी केला. हा काही पहिला प्रकार नसून अनेकांना त्रास दिल्याच्या घटना व्यावसायिकांनी कथन केल्या. घटनेची वार्ता पसरताच सराफ व्यावसायिकांनी बंद पाळला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या कार्यालयात मोठा जमाव जमला होता. घडलेल्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक दिलीप नागरे, प्रकाश कुलथे, सोमनाथ महाले, हेमंत दहिवाळ, मनोज चिंतामणी, उमाकांत लोळगे, दिनकर उदवंत, गणेश मुंडलिक, श्रीकांत दहिवाळ, बाळासाहेब नागरे, गणेश दहिवाळ, योगेश मुंडलिक, उमेश मैड आदी व्यावसायिक उपस्थित होते.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
संगमनेर येथील पोलीस शहरात येत व्यावसायिकांना वेठीस धरतात. मात्र श्रीरामपूर पोलिसांना त्याची खबर देत नाहीत यावर अनेकांनी आक्षेप घेतला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. घटनेची माहिती घेऊन उचित कारवाइ केली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी व्यावसायिकांना दिली.
 

 

Web Title: Poisoned in front of police: accusations of stolen gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.