महापालिकेचा सभापती, नगरसेवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:36 PM2019-06-18T13:36:24+5:302019-06-18T13:37:07+5:30

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती मुदस्सर शेख याला सोमवारी तोफखाना पोलिसांनी अटक केली.

NMC municipal chairman, corporator arrested | महापालिकेचा सभापती, नगरसेवकाला अटक

महापालिकेचा सभापती, नगरसेवकाला अटक

googlenewsNext

अहमदनगर: खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती मुदस्सर शेख याला सोमवारी तोफखाना पोलिसांनी अटक केली़
शहरातील सर्जेपुरा परिसरात १५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आरिफ शेख व बहुजन समाज पार्टीचा नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. त्यातून दगडफेक झाली. या घटनेत चार जण जखमी झाले होते़ याप्रकरणी पोलिसांनी दिलेली फिर्याद व परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़
ही घटना घडल्यापासून मुदस्सर शेख फरार होता़ सोमवारी मुदस्सर याच्यासह याच गुन्ह्यातील शोएब शेख पोलिसांसमोर हजर झाले़ त्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांना मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़ दरम्यान या गुन्ह्यातील दोन्ही गटातील आरोपी अद्याप फरार आहेत़ मुदस्सर शेख हे सध्या महापालिकेत स्थायी समितीचे सभापती आहेत.
दरम्यान सभापती शेख यांना अटक झाल्याने महापालिकेतील अंदाजपत्रक आणि स्थायी समितीच्या सभाही लटकणार आहेत. स्थायी समितीच्या ज्येष्ट सदस्याच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याचा आणखी एक मार्ग आहे.

नगरसेवकाला अटक
अहमदनगर : पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यांना मारहाण करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील नारायण त्रिंबके (वय ४४ रा़ संदेशनगर, वसंत टेकडी,नगर) याला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़
मागील भांडणातून गुन्हा दाखल केल्याच्या रागातून त्रिंबके व इतर सहा जणांनी १२ मे रोजी पोलीस कर्मचारी पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली होती़ या घटनेनंतर म्हस्के यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात त्रिंबके याच्यासह अमित गाडे, प्रताप गायकवाड व इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून त्रिंबके फरार होता़ सोमवारी त्रिंबके हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार पोलीस हेड कॉस्टेबल मन्सूर सय्यद, पोलीस नाईक संदीप घोडके, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे, संतोष लोढे, रविंद्र कर्डिले यांच्या पथकाने त्रिंबके याला अटक केली़

Web Title: NMC municipal chairman, corporator arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.