Ahmednagar Municipal Election खासदार गांधींना झटका, पुत्र सुवेंद्र, सून दीप्ती पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:09 PM2018-12-10T14:09:05+5:302018-12-10T14:45:57+5:30

नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसने नगरमध्ये जोरदार जल्लोष सुरु केला आहे 

MP Gandhinagar defeats son Suvendra, Sun Dipti | Ahmednagar Municipal Election खासदार गांधींना झटका, पुत्र सुवेंद्र, सून दीप्ती पराभूत

Ahmednagar Municipal Election खासदार गांधींना झटका, पुत्र सुवेंद्र, सून दीप्ती पराभूत

googlenewsNext

अहमदनगर : नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसने नगरमध्ये जोरदार जल्लोष सुरु केला आहे राष्ट्रवादीची सर्वाधिक जागांवर आघाडीवर असून, भाजप अपेक्षित जागांपेक्षाही पिछाडीवर गेला आहे़ दरम्यान भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना मोठा झटका बसला असून, त्यांचे पुत्रे सुवेंद्र व सून दीप्ती यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे़
भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांना प्रभाग ११ (ड) मध्ये शेख नजिर अहमद(राष्ट्रवादी) यांनी पराभूत केले़ तर प्रभाग १२ (ब) मधून दीप्ती गांधी यांना महापौर सुरेखा कदम (सेना) यांनी पराभूत केले़

प्रभाग चौदा (अ) मधून राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे, प्रभाग चौदा (ब) मधून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप, प्रभाग चौदा (क) मधून राष्ट्रवादीच्या मीना चोपडा, प्रभाग चौदा (ड) मधून राष्ट्रवादीचे गणेश भोसले हे उमेदवार विजयी झाले आहेत़ प्रभाग चौदा (अ) मधून शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांना पराभवाचा झटका बसला असून, प्रभाग चौदा (ब) मधून संगीता दिलीप गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे़ संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल यांनी त्यांना धुळ चारली आहे़ हे निकाल हाती येताच राष्ट्रवादीच्यावतीने मतमोजणी केंद्राबाहेर जोरदार जल्लोष सुरु केला आहे़ मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड गर्दी असून, पोलिसांना जमाव काबूत ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे़ पोलिसांनी एक जणाला ताब्यात घेतले आहे़
भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांना प्रभाग ११ (ड) मध्ये शेख नजिर अहमद यांनी पराभूत केले़ तर प्रभाग १२ (ब) मधून दीप्ती गांधी यांना महापौर सुरेखा कदम यांनी पराभूत केले

 

Web Title: MP Gandhinagar defeats son Suvendra, Sun Dipti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.