महावितरणविरोधात जिल्हाभरात आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 02:40 PM2017-10-30T14:40:05+5:302017-10-30T14:48:48+5:30

जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले आदी तालुक्यांमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन करण्यात आले.

Movements in the District against MahaVitran | महावितरणविरोधात जिल्हाभरात आंदोलने

महावितरणविरोधात जिल्हाभरात आंदोलने

Next

अहमदनगर : महावितरण कंपनीने वीज पंपांची वीज तोडण्याची कारवाई सुरु केल्यानंतर जिल्हाभरात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मागील आठवड्यात सुरु झालेल्या आंदोलनांची धार कायम असून, सोमवारीही जिल्हा आंदोलनांनी दणाणून निघाला.
जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले आदी तालुक्यांमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी व काँगे्रसच्या वतीने महावितरणच्या अधिका-यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, सिद्धार्थ मुरकुटे, बाळासाहेब पटारे, नगरसेवक राजेंद्र पवार, केतन खोरे, लकी सेठी, अशोक बागुल आदींनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला.
कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्या नेतृत्वाखाली महावितणविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, शाम कानगुडे, थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे, अ‍ॅड़ सुरेश शिंदे, बाळासाहेब सपकाळ, गजेंद्र यादव, स्वप्निल तनपुरे, अण्णासाहेब मोरे, दत्ता पोटरे आदी उपस्थित होते.
या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. पिके जोमात आहेत. मात्र महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे पिके कोमात जाण्याची वेळ आली आहे. बहुतेक रोहीत्र महावितरणच्या अधिका-यांनी वसुलीचे कारण दाखवून बंद केली आहेत. यामुळे शेतातील पिके सुकू लागली आहेत. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तुम्ही अगोदर विज बिले भरा, मगच वीज पुरवठा सुरू होईल, अशी भूमिका महावितरणच्या अधिका-यांनी घेतली आहे. त्यामुळे पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे वीज पुरवठा सुरु करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.

Web Title: Movements in the District against MahaVitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.