कांदा वखारीवर वीज पडली : हजार गोणी कांदा जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:54 AM2019-04-16T11:54:52+5:302019-04-16T11:55:13+5:30

बोरी येथील विठ्ठल मोरे, पंढरीनाथ मोरे यांच्या कांदा वखारीवर वीज पडून सुमारे एक हजार कांदा गोण्या जळाला.

 Lightning on the onion barn: Thousands of goon burns onion | कांदा वखारीवर वीज पडली : हजार गोणी कांदा जळाला

कांदा वखारीवर वीज पडली : हजार गोणी कांदा जळाला

Next

श्रीगोंदा : बोरी येथील विठ्ठल मोरे, पंढरीनाथ मोरे यांच्या कांदा वखारीवर वीज पडून सुमारे एक हजार कांदा गोण्या जळाला. यामध्ये पाच लाखांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाऊसजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला दुष्काळाने कंबरडे मोडले आहे. तर दुस-या बाजूला अवकाळी पावसाचे ढग डोक्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे मोसमी पाऊस लांबणीवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोमवारी संध्याकाळी बोरी परिसरातील अवकाळी पावसात वीज कडाडली. विजेने पंढरीनाथ मोरे व विठ्ठल मोरे यांच्या वखारीला लक्ष्य केले. सुमारे पाच लाख किमंतीचा कांदा काही क्षणात जळून खाक झाला.

Web Title:  Lightning on the onion barn: Thousands of goon burns onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.