गोरेगाव ग्रामस्थांनी उभारले कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:16+5:302021-05-20T04:23:16+5:30

पारनेर : तालुक्यातील गोरेगाव येथे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी कोविड सेंटर उभारले आहे. त्यात तपासणी ते उपचारापर्यंतच्या उपाययोजना ...

Kovid Center set up by Goregaon villagers | गोरेगाव ग्रामस्थांनी उभारले कोविड सेंटर

गोरेगाव ग्रामस्थांनी उभारले कोविड सेंटर

Next

पारनेर : तालुक्यातील गोरेगाव येथे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी कोविड सेंटर उभारले आहे. त्यात तपासणी ते उपचारापर्यंतच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

गोरेगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्याने गावात जास्तीत जास्त टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी सांगितले. लोकांना वैद्यकीय सेवेशिवाय इतर कारणासाठी फिरण्यास कडक निर्बंध घातले. ज्यांचा टेस्ट रिझर्ल्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना जिथे शक्य असेल तेथे सरकारी, खासगी हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटरमध्ये, सौम्य लक्षणे असतील, सॅच्युरेशन लेव्हल चांगली असेल त्यांना शाळेत थांबण्यास सांगितले. त्रास नसेल तरी घरी उपचार घेण्यास १०० टक्के मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी जनजागृती करण्याचे काम सर्व टीम करत आहे. पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या लोकांना टेस्टिंगसाठी प्रवृत्त केले जात असल्याचे तांबे यांनी सांगितले.

बाबासाहेब तांबे मित्रमंडळाच्यावतीने शाळेत कोरोना कक्षातील तसेच विलगीकरणातील नागरिकांना मिनरल वॉटर, दोन वेळ चहा, नाश्ता, दुपारचे अन् संध्याकाळचे जेवण, एक व्यक्ती एक पॅकिंग असे स्वतंत्र दिले जात आहे. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी किंवा बाहेरील व्यक्तींशीही संपर्क होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत हे अन्न पोहोच केले जाते. सर्व रुग्णांना एक खजूर पॅकेट, सॅनिटायझर, नॅपकिन, साबण, ब्रश, टूथपेस्ट, असे प्रत्येकी एक कीट दिले गेले.

---

खासगी डॉक्टरांचेही सहकार्य

गावातील डॉ. तांबे, डॉ. खरमाळे, डॉ. पादिर या खासगी डॉक्टरांच्या दैनंदिन सकाळ, दुपार, संध्याकाळ, अशा फेऱ्या होतात. तसेच आवश्यकतेनुसार डॉ. तांबे रात्रं-दिवस उपलब्ध होत आहेत.

शिक्षक, अंगणवाडी सेविका, इतर कर्मचारी यांची या ठिकाणी रात्रं-दिवस नियुक्ती करण्यात आलेली आहे. ग्रामविकास अधिकारी, तलाठी उपस्थित राहत असल्याचे सरपंच सुमन तांबे यांनी सांगितले.

---

अडीच लाख वर्गणी जमा

गोरेगावमधील कोविड सेंटरसाठी अडीच लाख रुपये वर्गणी ग्रामस्थांनी दिली. परदेशात असलेले डॉ. तांबे यांनी औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

----

फोटो ओळी

गोरेगाव येथे कोविड रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर.

Web Title: Kovid Center set up by Goregaon villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.