दिल्लीच्या व्यापा-याला लुटणारे लुटारू नागापूर येथून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 05:30 PM2018-03-27T17:30:30+5:302018-03-27T17:30:30+5:30

व्यापा-याचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटणा-या दोघा लुटारूंना मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने नागापूर येथून जेरबंद केले.

Jeriband from the robber gangraped by Delhi gang-racket | दिल्लीच्या व्यापा-याला लुटणारे लुटारू नागापूर येथून जेरबंद

दिल्लीच्या व्यापा-याला लुटणारे लुटारू नागापूर येथून जेरबंद

Next

अहमदनगर : व्यापा-याचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटणा-या दोघा लुटारूंना मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने नागापूर येथून जेरबंद केले.
स्वप्नील पोपट परभत (वय २१) व दिनेश सुरेश खैरनार (वय ३३ रा. दोघे नवनागापूर, नगर) अशी आरोपींची नावे आहेत़ दिल्ली येथील व्यापारी अनिल विजयपाल तिवारी हे कामानिमित्त नगर येथे आले होते. माळीवाडा परिसरातील ते आनंद लॉज येथे राहात होते. तिवारी हे लॉज परिसरात असताना २३ मार्च रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांना भेटले. आमच्या साहेबांना वेल्डिंगच्या कामाची आॅर्डर द्यावयाची आहे. यासाठी तुम्हाला आमच्या बरोबर यावे लागेल, असे सांगून तिवारी यांना या दोघांनी दुचाकीवर बसवून एमआयडीसी परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथे गेल्यानंतर दोघांनी तिवारी यांना मारहाण करत त्यांच्याकडील १२ हजार रुपये रोख व एक मोबाईल असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी तिवारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ही चोरी नागापूर येथील दोघांनी केली असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक निरीक्षक शिवाजी नागवे, कॉन्स्टेबल अभिजित अरकर, नितीन शिंदे, ज्योती काळे, रिंकी माढेकर, गाडगे, गव्हारे यांच्या पथकाने आरोपींना नागापूर येथून जेरबंद केले.

Web Title: Jeriband from the robber gangraped by Delhi gang-racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.