अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक : जलसंपदामंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:54 PM2018-09-14T16:54:30+5:302018-09-14T16:54:35+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Government positive about the demand of Anna Hazare: Water Resources Minister Girish Mahajan | अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक : जलसंपदामंत्री गिरीश महाजन

अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक : जलसंपदामंत्री गिरीश महाजन

googlenewsNext

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मात्र अण्णा हजारे २ आॅक्टोबरपासून उपोषणावर ठाम आहेत.
गिरीष महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णाशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने अण्णांनी नमूद केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांना सांगितले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय झाला असून येत्या हंगामापासून तसा दर शेतक-यांना निश्चितपणे मिळेल, असे महाजन यांनी सांगितले. अण्णांनी नमूद केलेले काही प्रश्न हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असून केंद्र शासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. केंद्रात लोकायुक्त आणि राज्यस्तरावर केंद्रात लोकपाल आणि राज्यस्तरावर लोकायुक्त यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाजन यांनी अण्णांचे मुख्यमंत्री महोदयांशी बोलणे करून दिले.

Web Title: Government positive about the demand of Anna Hazare: Water Resources Minister Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.