मोफत २५ टक्के प्रवेशासाठी ११ तारखेपर्यंत मुदत

By admin | Published: July 7, 2016 11:08 PM2016-07-07T23:08:40+5:302016-07-07T23:26:02+5:30

अहमदनगर : बालकांना आरटीई कायदा २००९ नुसार देण्यात येणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण पूर्ण झाली.

Free upto 25% admission deadline till 11th | मोफत २५ टक्के प्रवेशासाठी ११ तारखेपर्यंत मुदत

मोफत २५ टक्के प्रवेशासाठी ११ तारखेपर्यंत मुदत

Next

अहमदनगर : बालकांना आरटीई कायदा २००९ नुसार देण्यात येणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण पूर्ण झाली. यात ८५ विद्यार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ५ ते ११ जुलैपर्यंत मुदत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. ही मुदत संपल्यानंतर मोफत प्रवेशाची तिसरी व शेवटची फेरी होणार आहे.
शिक्षण संचालनालयाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व विना अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये आॅनलाईन पध्दतीने २५ टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. यावर्षी नगर शहरासह जिल्ह्यातील ४१६ शाळांपैकी ३०१ शाळा मोफत प्रवेशासाठी पात्र होत्या. या ठिकाणी ४ हजार १९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी क्षमता होती. यात पहिलीसाठी ३ हजार ६५३ आणि पूर्व प्राथमिकसाठी ५३७ विद्यार्थ्यांची क्षमता होती. पात्र असणाऱ्या शाळांमध्ये १०७ कायम विना अनुदानित, १६३ स्वयंअर्थसहायित व अन्य ३५ शाळांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत १ हजार ६४७ अर्जापैकी १ हजार ३०५ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. ४ जुलैला मोफत प्रवेशासाठी दुसरी फेरी घेण्यात आली. त्यात ८५ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. दुसऱ्या फेरीत लॉटरी लागलेल्या पालकांनी ११ जुलैपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कडूस यांनी केली आहे.

Web Title: Free upto 25% admission deadline till 11th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.