वीज कोसळून महिला ठार

By admin | Published: May 28, 2014 11:54 PM2014-05-28T23:54:56+5:302014-05-29T00:29:58+5:30

अकोले : आढळा खोर्‍यात बुधवारी साडेचारच्या सुमारास वीज कोसळून एक शेतमजूर विवाहिता ठार झाली. सलग तिसर्‍या दिवशी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Electricity collapses women killed | वीज कोसळून महिला ठार

वीज कोसळून महिला ठार

Next

अकोले : आढळा खोर्‍यात बुधवारी साडेचारच्या सुमारास वीज कोसळून एक शेतमजूर विवाहिता ठार झाली. सलग तिसर्‍या दिवशी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुथाळने गावच्या नायकरवाडी शिवारात गीता दशरथ मोहिते (वय ३४) ही विवाहिता शेतात शेळ्या चारत असताना साडेचारच्या सुमारास वादळवार्‍यासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे झाडाचा आश्रय घेण्यासाठी जात असतानाच महिलेच्या अंगावर वीज पडली व त्यात गंभीर भाजल्याने जागेवरच तिचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला. वीज पडून मृत्यू होण्याची या महिन्यातली ही तिसरी घटना आहे. मयत गीता यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सकाळपासून आकाश काळ्या ढगांनी भरलेले होते, तर दिवसभर उकाडा जाणवत असताना सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळवार्‍याचे काहूर झाले. अकोले परिसरासह मुथाळने, नायकरवाडी, पागीरवाडी, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, टाकळी, ढोक्री, गर्दणी असा सर्वदूर अर्धा तास जोराचा अवकाळी पाऊस कोसळला. विजांचा थयथयाट भयकंपित करणारा होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Electricity collapses women killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.