एकाकीपणामुळे तरुणांना मोबाईलवर पब्जीचे वेड : राजरत्न खिल्लारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:30 PM2019-07-07T13:30:55+5:302019-07-07T13:31:53+5:30

पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

Due to loneliness, youth wanders on mobile: Rajaratna Khilare | एकाकीपणामुळे तरुणांना मोबाईलवर पब्जीचे वेड : राजरत्न खिल्लारे

एकाकीपणामुळे तरुणांना मोबाईलवर पब्जीचे वेड : राजरत्न खिल्लारे

Next

भरत मोहोळकर
अहमदनगर : पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. पब्जीच्या आहारी जाऊन आत्महत्या करणारा जिल्ह्यातील तो दुसरा बळी ठरला आहे. तर अनेक मुले पब्जीच्या वेड्यापायी आई-वडिलांपासून दुरावत आहेत. या गेमच्या आहारी जाण्यापासून तरुणांना कसे परावृत्त करता येईल, याबाबत न्यू आर्टस् महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील समुपदेशक प्रा. राजरत्न खिल्लारे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.

प्रश्न : पब्जी या गेमचे व्यसन नेमके कसे लागते?
उत्तर : नात्यात विसंवाद निर्माण झाल्यानंतर तो एकाकीपणा घालवण्यासाठी मुले हा गेम खेळायला सुरूवात करतात. या गेमध्ये अनेक टप्पे आहेत. त्यात प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी तरूण प्रयत्न करतात. मग जर एखाद्या टप्प्यावर अपयश आले तर तो टप्पा पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा प्रयत्न करतात. या यशापयशाच्या खेळात त्यांच्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याने या गेमचे सवयीत व सवयींचे रूपांतर व्यसनात होते.

प्रश्न : या गेमचा तरूणांवर काय परिणाम होतो?
उत्तर : या गेममुळे तरूणांचा वेळ वाया जातो. तसेच या गेमचा तरूणांच्या मनावर भयंकर परिणाम होतो. यामध्ये पब्जीचे टप्पे पार झाले नाहीत तर मनावर ताण येतो.यामुळे नैराश्यता येते. त्यामुळे ते आणखी जास्त वेळ गेम खेळतात. त्यामुळे डोळे व डोके दुखण्याची शक्यता असते. या गेमची सवय लागली तर झोप व जेवणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो. या सगळ्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.

प्रश्न : या विळख्यातून सोडवण्यासाठी काही ठोस उपाय?
उत्तर : तरूण या व्यसनात किती अडकला आहे ते तपासून त्याच्या समुपदेशनातून त्याला विळख्यातून बाहेर काढता येईल. पालकांनीही मुलांसोबत सुसंवाद ठेवावा. तरूणांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक भावना जागवावी. गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, यांसारख्या विशिष्ट कामात मन गुंतवले तर हे व्यसन सोडवायला मदत होईल.

प्रश्न : पब्जी गेमकडे तरूण का वळतो आहे?
उत्तर : कुटुंबात निर्माण होणारा विसंवाद, तरूण तरूणींमधील ब्रेकअपचे वाढते प्रमाण, त्यातून निर्माण होणारा एकाकीपणा, त्यातून येणारे नैराश्य यामुळे तरुण पब्जीसारख्या गेमकडे वळला आहे. आर्थिक चणचण हे एक कारण आहे.

तरुणांचा पालकांशी विसंवाद आहे. बेरोजगारी, अपयश आणि कमी पैशात नेट पॅक ही पब्जीकडे ओढली जाण्याची कारणे आहेत. -राजरत्न खिल्लारे

 

Web Title: Due to loneliness, youth wanders on mobile: Rajaratna Khilare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.