कारचालकानेच मित्रांच्या मदतीने कुरकुटवाडी येथील महिलेला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:19 PM2018-01-29T16:19:55+5:302018-01-29T16:21:25+5:30

बोटा येथे जाण्यासाठी निघालेल्या कुरकुटवाडी येथील महिलेला अज्ञात कारचालकांनी नाशिक-पुणे महामार्गाववर संतवाडी फाटा येथे लुटल्याची घटना रविवारी घडली.

The driver of the woman has robbed a woman in Kurukuthwadi with the help of friends | कारचालकानेच मित्रांच्या मदतीने कुरकुटवाडी येथील महिलेला लुटले

कारचालकानेच मित्रांच्या मदतीने कुरकुटवाडी येथील महिलेला लुटले

Next

बोटा : बोटा येथे जाण्यासाठी निघालेल्या कुरकुटवाडी येथील महिलेला अज्ञात कारचालकांनी नाशिक-पुणे महामार्गाववर संतवाडी फाटा येथे लुटल्याची घटना रविवारी घडली.
कुरकुटवाडी (ता. संगमनेर) येथील लीला भाऊसाहेब कुरकुटे (वय ४५) यांची मुलगी आळेफाटा येथे रुग्णालयात उपचार घेत आहे. लीलाबाई मुलीला भेटून आळेफाटा येथून रविवारी सकाळी बोटा येथे जाण्यासाठी आळेफाटा चौकात थांबल्या होत्या. त्यावेळी तेथे एक कार येऊन थांबली व तुम्हाला बोटा येथे सोडतो, असे लीलाबाई यांना या कारचालकाने सांगितले. त्यावेळी कारमध्ये तिघजण बसलेले होते. दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील संतवाडी फाटा येथे ही कार आली असताना कारचालकाने कार थांबवली. कारमधील तिघांनी लीलाबाई यांना दमदाटी करून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रूपये दागिने, मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी लीलाबाई यांचे डोळे स्कर्पने बांधले व कार घेऊन तेथून पळ काढला. त्यानंतर लीलाबाई यांनी आळेफाटा पोलीस ठाणे गाठून संबंधीत तीन चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. आळेफाटा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: The driver of the woman has robbed a woman in Kurukuthwadi with the help of friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.