कर्नाटकच्या पार्श्वभुमीवर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:36 PM2018-05-18T17:36:38+5:302018-05-18T17:36:38+5:30

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असताना येथील राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्याची संधी देऊन लोकशाहीचा व घटनेतील तरतुदींचा खून केल्याचा आरोप करीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर लोकशाहीचा कालादिवस संबोधून या घटनेचा निषेध नोंदवत निदर्शने केली. आंदोलनकॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

Demonstrations in front of District Collectorate on behalf of city district Congress on the backdrop of Karnataka | कर्नाटकच्या पार्श्वभुमीवर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कर्नाटकच्या पार्श्वभुमीवर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Next
ठळक मुद्देलोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप लोकशाहीचा कालादिवस संबोधून या घटनेचा निषेध

अहमदनगर : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असताना येथील राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्याची संधी देऊन लोकशाहीचा व घटनेतील तरतुदींचा खून केल्याचा आरोप करीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर लोकशाहीचा कालादिवस संबोधून या घटनेचा निषेध नोंदवत निदर्शने केली. आंदोलनकॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या मेघालय, मणिपूर व गोवा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळालेल्या असतांनासुद्धा काँग्रेस पक्षाला सरकार बनविण्याची संधी नाकारण्यात आलेली होती. उलटपक्षी कर्नाटक मध्ये राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन मेघालय, मणिपूर व गोवा या राज्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. ही बाब अत्यंत चुकीची व लोकशाहीचा गळा दाबणारी असून, यामुळे काल अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ विधी पार पडलेला आहे. ही बाब असंविधानिक असून लोकशाहीच्या तत्वाला काळिमा फासणारी आहे. भारतीय जनता पक्ष व केंद्र शासन देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, सचिन घोडके, शामराव वागस्कर, सुनीता साळवी, रजनी ताठे, गौरव ढोणे, बाळासाहेब भंडारी, आर.आर. पिल्ले, नलिनीताई गायकवाड, निजाम जहागीरदार, योगेश दीवाने, डॉ.जायदा शेख, रुपसिंग कदम, दिलीप सकट, मयूर पाटोळे, जरीना शेख यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Demonstrations in front of District Collectorate on behalf of city district Congress on the backdrop of Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.