मिरी परिसरात पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:15+5:302021-09-13T04:21:15+5:30

मिरी : पाथर्डी तालुक्यातील मिरीसह आडगाव, कामात शिंगवे, रेणुकावाडी, जोडमोहज, शिराळ या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ...

Crop damage in Miri area | मिरी परिसरात पिकांचे नुकसान

मिरी परिसरात पिकांचे नुकसान

googlenewsNext

मिरी : पाथर्डी तालुक्यातील मिरीसह आडगाव, कामात शिंगवे, रेणुकावाडी, जोडमोहज, शिराळ या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

यामध्ये कपाशी, उडीद, तूर, फळबागांचे मोठे नुकसान झाले. कडगाव, मिरी परिसरातील शेतकऱ्यांचे पीक अक्षरश: पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास या अधिकच्या पावसामुळे वाया गेला आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस पाण्याखाली गेला आहे. सोयाबीन, बाजरी या पिकांचेही नुकसान झाले आहे. महसूल, कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते महादेव कुटे , माजी सरपंच साहेबराव गवळी, अध्यक्ष अशोक झाडे, माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, संभाजी सोलाट, राजू इनामदार, लहानू जाधव, बालम इनामदार यांनी केली आहे.

Web Title: Crop damage in Miri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.