बस वाहकाला मारहाण : प्रवासी अटकेत, सात दिवसाची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:33 PM2018-05-06T18:33:08+5:302018-05-06T18:33:08+5:30

जामखेड ते धनेगाव बसमधून प्रवास करताना वाहकाने प्रवाशाला हाफ तिकीट देण्यासाठी वयाचा दाखला मागीतला राग आला. या रागातून प्रवाशाने वाहकास लाथाबुक्क्यांनी केली.

Bus passenger assault: passenger detention, seven-day police closet | बस वाहकाला मारहाण : प्रवासी अटकेत, सात दिवसाची पोलीस कोठडी

बस वाहकाला मारहाण : प्रवासी अटकेत, सात दिवसाची पोलीस कोठडी

Next

जामखेड - जामखेड ते धनेगाव बसमधून प्रवास करताना वाहकाने प्रवाशाला हाफ तिकीट देण्यासाठी वयाचा दाखला मागीतला राग आला. या रागातून प्रवाशाने वाहकास लाथाबुक्क्यांनी केली. याप्रकरणी वाहक संतोष शिंदे यांन दिलेल्या फिर्या दिवरून जामखेड पोलिसांनी प्रवासी दत्तात्रय बाबूराव गोरे (वय ४०, रा. आपटी ता. जामखेड) यास अटक केली असून न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (दि. ५) रोजी सायंकाळी ६.३० वाजता जामखेड बसस्थानकातून जामखेड - धनेगाव बस धनेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या अरोळेवस्ती या ठिकाणी बस आली असता वाहक संतोष आप्पासाहेब शिंदे (वय ३२ रा. सावरगावघाट ता. पाटोदा) याने प्रवासी दत्तात्रय बाबूराव गोरे यास तिकाटाची मागणी केली. गोरे याने वाहक शिंदे यांच्याकडे हाफ तिकीटाची मागणी केली. यावेळी वाहक शिंदे यांनी त्यास वयाचा दाखला म्हणून कागदपत्रे मागीतली. कागदपत्रे मागितल्यान राग गोरे यास आला. या रागातून वाहकाला मारहाण करत शिवीगाळ केली. त्यामुळे बस जामखेड पोलीस स्टेशनला नेत आरोपी प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देऊन घडलेल्या घटनेची माहिती देऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गोरे यास अटक केली. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गोरे यास रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

Web Title: Bus passenger assault: passenger detention, seven-day police closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.