कार-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:00 PM2018-11-01T14:00:16+5:302018-11-01T14:01:03+5:30

नाशिक-शिर्डी मार्गावर के.के.मिल्क जवळ स्वीप्ट कार व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर

Both die in a car-bike accident | कार-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

कार-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

Next

शिर्डी : नाशिक-शिर्डी मार्गावर के.के.मिल्क जवळ स्वीप्ट कार व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल नवनाथ चंद्रभान कुसळकर, चांगदेव आहिरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक-शिर्डी मार्गावर मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्विप्ट कार तसेच मोटारसायकल क्रमांक एम.एच.-१७, ई-७८२१ यांच्यात अपघात झाला. मोटारसायकलवरील नवनाथ कुसळकर व चांगदेव आहिरे हे दोघे जबर जखमी झाले.
कुसळकर यांचा साईनाथ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तर चांगदेव आहिरे यांचा लोणी येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला.

Web Title: Both die in a car-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.