बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 07:00 PM2024-03-06T19:00:20+5:302024-03-06T19:02:22+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्याही आता राजकारण सक्रीय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Balasaheb thorat daughter jayashree thorats appointment to an important position in congress | बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी

बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी

Congress Balasaheb Thorat ( Marathi News ) : राजकीय नेत्यांच्या मुलांचा राजकारणात होणारा प्रवेश ही नवी गोष्ट नाही. मुलांसोबतच आता राजकीय नेत्यांची मुलीही आपल्या पित्याचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरत असल्याचं चित्र अलीकडच्या काळात दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्याही आता राजकारणात सक्रीय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण जयश्री थोरात यांची आज संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हेदेखील काँग्रेसमध्ये होते. थोरात कुटुंबाचं संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक दशकांपासून एकहाती वर्चस्व राहिलं आहे. याच मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे सलग तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळलेले थोरात हे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशा स्थितीत त्यांनी आपली कन्या जयश्री थोरात यांना तालुका स्तरावर सक्रिय करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

जयश्री थोरात या मागील काही काळापासून सोशल मीडियावरही राजकीय घडामोडींवर व्यक्त होत असतात. आता त्यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. आगामी काळात त्या संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

विजय वडेट्टीवारांची कन्याही मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी नुकतंच आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. या मतदारसंघातून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचंही शिवानी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स हँडलवर याबाबतची पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरं तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करायची होती. मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार," असा निर्धार शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Balasaheb thorat daughter jayashree thorats appointment to an important position in congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.