अहमदनगरची स्वरकन्या अंजली गायकवाड ‘सारेगमप’ची ‘लिटल चॅम्प’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:54 AM2017-10-31T01:54:40+5:302017-10-31T01:55:17+5:30

‘सारेगमप लिटल चॅम्प’चे विजेतेपद अहमदनगरची स्वरकन्या अंजली अंगद गायकवाड हिने पटकावले. अंजली आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्ट्याचार्य यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले.

Anjali Gaikwad's sarogam of 'Ahmednagar', 'Little Champ' | अहमदनगरची स्वरकन्या अंजली गायकवाड ‘सारेगमप’ची ‘लिटल चॅम्प’

अहमदनगरची स्वरकन्या अंजली गायकवाड ‘सारेगमप’ची ‘लिटल चॅम्प’

googlenewsNext

अहमदनगर : ‘सारेगमप लिटल चॅम्प’चे विजेतेपद अहमदनगरची स्वरकन्या अंजली अंगद गायकवाड हिने पटकावले. अंजली आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्ट्याचार्य यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. जयपूरमध्ये ‘सारेगमप लिटल चॅम्प २०१७’च्या सिझनचा ग्रँड फिनाले झाला. सोमवारी अंजली, तिची बहीण नंदिनी, आई-वडील व गुरू मनीषा व अंगद गायकवाड यांची नगरमध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षक ख्यातनाम गायक जावेद अली यांनी अंजलीचे कौतुक केले. अंतिम फेरीत सहा स्पर्धक होते. १७० देशांतून त्यांना मतदान करण्यात आले. अंजलीला सर्वाधिक मते मिळाली. यापूर्वी अंजली-नंदिनी जोडीने ‘महाराष्ट्राचा संगीत सम्राट’ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. अंजलीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला. अंजली ही सावेडी येथील आनंद विद्यालयात सातवीत तर तिची बहीण नंदिनी नववीत शिकत आहे.

Web Title: Anjali Gaikwad's sarogam of 'Ahmednagar', 'Little Champ'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.