Spiritual : निस्वार्थ सेवाभाव: हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:39 PM2019-02-16T13:39:14+5:302019-02-16T13:40:40+5:30

इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते.

Selfless service: This is the mantra of successful life! | Spiritual : निस्वार्थ सेवाभाव: हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र!

Spiritual : निस्वार्थ सेवाभाव: हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र!

Next


‘वैष्णव जन तो तेने कहीये, जे पीड परायी जाणे रे।

पर दु:खे उपकार करे तो ये, मन अभिमान न आणे रे।।’

इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते. आपण आपल्या आचरणात नेहमीच सेवेची भावना ठेवावी, जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल आणि यशाच्या मार्गावर ते अग्रेसर होतील. सेवाभावी व्यक्ती स्वत: सोबत आपल्या सहकाºयांशी आणि आपल्या सेवाव्यवस्थापकाशी प्रामाणिक असायला हवा. सेवेची विविध पातळ्यांमधील कमतरता यामुळे मनुष्य हळुहळू अधोमार्गाने जायला सुरूवात होते. सेवेची भावनाच हा आपल्यासाठी आत्मसंतोषाचा केवळ वाहक न ठरता, आपल्या संपर्कात येणाºया अनेक व्यक्तीमध्ये चांगुलपणा संदेश सदोदित पसरवित असतो आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे गुलाबाला सांगावे लागत नाही की, तु सुगंध पसरवत अपितू सुगंध पसरत अपितु सुगंधच त्याचा संदेश आहे. त्याचप्रमाणे, सुंदर लोक हे नेहमीच दयाळू नसतात, पण करूणामय लोक नेहमीच सुंदर असतात हे जगजाहीर आहे.

सामाजिक, आर्थिक आणि सर्वरूपामध्ये सेवाभावाचे त्याचे स्वत:चे असे मुल्य आहे. सेवाभाव असल्याशिवाय कुठलेही पुण्यकर्म प्राप्त करू शकत नाही. सेवाभावाच्या माध्यमातूनच समाजातील वाईट, अनिष्ट रितीरिवाज ह्या मुळापासून समाप्त करण्यासोबतच सामान्य माणसांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबाबत जागृत करता येवू शकते. मुळाच सेवाभाव हा मनुष्य-मनुष्यातल वाहक आहे. जेव्हा आपण एकमेकांप्रती सेवाभावाचे आचरण करीत असतो तेव्हा आपल्यातील व्देशाची भावना ही आपोआप समाप्त होवून जाते आणि आपण सारे यशाच्या उन्नतीच्या मार्गावर अग्रेसीत होत ज्याला मनुष्य सहजतेने अंगीकार करू शकेल असा ह्या अखिल विश्वात सेवेपेक्षा कोणताच मोठा परोपकार नाही. प्राथमिक शिक्षणापासून ते आपल्या अंतिम क्षणापर्यंत सेवाच असे एकमेव आभुषण आहे. जे आपल्या जीवनाला सार्थक बनण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावित असते. सेवाभाव विरहीत विकसीत मनुष्य जीवन निरर्थक आहे. आपण सर्वांनी सेवेचे हे महत्व समजून घेऊन समाजामध्ये ते इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना जागृत करायला हवे.


- सविता लिलाधर तायडे
 

Web Title: Selfless service: This is the mantra of successful life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.