दैवी संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:23 AM2019-01-19T06:23:01+5:302019-01-19T06:23:05+5:30

पाच कर्मेंद्रियांच्या व्यतिरिक्त कारण हे सत्याचा शोध घेण्याचे प्रमुख अस्त्र असू शकत नाही.

Divine wealth | दैवी संपत्ती

दैवी संपत्ती

googlenewsNext

- डॉ. मेहरा श्रीखंडे


स्विस गूढवादी कार्ल जंग जे सीगमंड फ्राइडचे समकालीन होते. त्यांना असे वाटायचे की, एखाद्याची कल्पनाशक्ती व स्वप्न ही त्याला एकत्रित झालेल्या अंतर्मनाशी सुसंवाद घडविते. ज्या वेळी मानव गूढवाद जाणत होता त्या वेळी तो एकत्रितपणे सर्व सांभाळत होता. मेंदूमध्ये खोलवर असलेली वाटाण्यासारखी पिनियल ग्रंथी ही तत्त्वज्ञानी व गूढवादी यांच्या मते भौतिक व अतिंद्रिय जगाशी संपर्क साधणारी एकसारखी आहे. ज्याला तिसरा डोळा किंवा आत्म्याची जागा असे म्हटले जाते, ती ही ग्रंथी ध्यान व दैवी शिक्षण याद्वारे उद्दीपित केली जाते. या तिसऱ्या डोळ्याच्या उद्दीपनाने आपण उच्च प्रतलाशी सरळ संपर्क साधू शकतो. काही माणसांनी ज्यांनी शरीराबाहेर जाण्याची प्रक्रि या सांधली आहे, त्यांचे असे म्हणणे आहे की ते या ग्रंथीच्या दरवाजातून बाहेर गेलेले आहेत.


पाच कर्मेंद्रियांच्या व्यतिरिक्त कारण हे सत्याचा शोध घेण्याचे प्रमुख अस्त्र असू शकत नाही. ज्याप्रमाणे सत्याचे अनेक पैलू आहेत, त्याचप्रमाणे माणसांचेही अनेक पैलू आहेत. भौतिक शरीर हे सात शरीरांपैकी फक्त एकच शरीर आहे. न बघितलेल्या सत्याशी संबंधित असलेली अतिंद्रिय शरीरे ही माणसाच्या भौतिक शरीराचाच भाग आहेत. त्याचा आपण अधिक गंभीरपणे विचार केला पाहिजे व त्याला समजून घेतले पाहिजे.


जीवनात नुसते वाहत जाण्यापेक्षा सत्याच्या पलीकडील भाग उलगडून बघितला पाहिजे. ध्यानधारणा शरीरातील ऊर्जाचक्रे चालू करतात व योग व प्राणायाम यात आपली मदत करतात. जास्त शक्ती प्रदान करताना व तणाव कमी करतानाच ती आपल्याला अंतर्दृष्टी देते व आपणास आपली कामे व्यवस्थित करण्यास मदत करते. ती मेंदू व मज्जासंस्था जागृत करतात व जीवनप्रवाह वाढविण्यास मदत करतात. दैवी जागृतावस्थेत पोहोचलेला माणूस आपल्या व दुसºयांच्या भविष्यात डोकावू शकतो. भौगोलिक संपत्तीपेक्षा दैवी संपत्ती खूप मोठी संपत्ती आहे. हाही एक महत्त्वाचा विचार आहे. तसेच त्या अनुषंगाने आपल्याला एका वेगळ्या मानसिकतेकडे जाण्याची वाट आढळून येते. भौगोलिक संपत्तीमुळे तत्कालिक सुख मिळते तर दैवी संपत्तीमुळे मानसिक समाधानाची परिसीमा गाठली जाते. या मानसिक स्थितीचे मोल त्या अवस्थेचे महत्त्व समजणारेच जाणू शकतात.


गूढवादाला एक चांगली व वाईट बाजूही आहे. त्याच्या अस्तित्वाला नाकारण्यापेक्षा त्याच्या चांगल्या बाजू विचारात घेऊन काम करणे कधीही चांगले. आपल्या जगाच्या आत असंख्य जगे आहेत व भौतिक परिस्थितीपलीकडेच खरे सत्य आहे. आपण मानव या सत्यापासून व दैवी शक्तींपासून फार दूर राहू शकत नाही, हे प्रत्येकाने विचारात घेतले पाहिजे.
दैवी शक्तीबाबत आसक्ती असली की मनुष्य त्याबाबत अधिकाधिक जाणून घेण्यास इच्छुक असतो. त्याबाबत सखोल चिंतन केल्यास भौतिक सुखांबाबत फारसा मोह राहत नाही. जसजसे दैवी शक्तींबाबत ज्ञान प्राप्त होत जाते तसतसे मनुष्याचे अवगुण गळून पडू लागतात आणि गुणांचा आविष्कार वाढत जातो. दैवी शक्ती आणि भौतिक सुखांची तुलना करीत गेल्यास त्यातील जमीन-अस्मानाचा फरक स्पष्टपणे जाणवू लागतो.

Web Title: Divine wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.