संजय राऊत हेच देशाचे मोठे गद्दार, नितेश राणे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:13 PM2023-06-02T12:13:41+5:302023-06-02T12:27:52+5:30

भारताच्या बाहेर जाऊन बदनामी करणारे देशाभिमानी असे राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी

Sanjay Raut is the country biggest traitor, MLA Nitesh Rane criticism | संजय राऊत हेच देशाचे मोठे गद्दार, नितेश राणे यांची टीका

संजय राऊत हेच देशाचे मोठे गद्दार, नितेश राणे यांची टीका

googlenewsNext

कणकवली : राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात 'खलिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या जातात. पाकिस्तानचे झेंडे फडकवत समर्थन केले जाते. मात्र, ते काही बोलत नाहीत. अशा लोकांचे समर्थन करणारे एकत्र येत असतील आणि त्यांना संजय राऊत हे राष्ट्रभक्त म्हणत असतील तर त्यांच्या इतके गद्दार देशात दुसरे कोणी नसेल, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे देशाचा अभिमान आहेत. त्यांनी भारत देशाला सन्मान मिळवून दिला आहे. त्यांची तुलना संजय राऊत हे राहुल गांधी यांच्याशी करत आहेत. तर राहुल गांधी यांनी देशासाठी काय केले आहे? हे राऊत यांनी सांगावे. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी करत आहेत, हे संजय राऊत यांना भांडुपमध्ये बसून कळत नाही काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेले तेव्हा, 'हिंदुस्तान जिंदाबाद', 'भारत माता की जय 'अशा घोषणा दिल्या जात होत्या. तर राहुल गांधी यांच्या सभेत 'खलिस्तान जिंदाबाद'चे नारे देण्यात आले. हा या दोन देशप्रेमींमधला फरक आहे. राहुल गांधी यांचे भाषण चालू असताना समोर बसलेले लोक भारताचे राष्ट्रगान सुरू असताना उभेसुद्धा राहिले नाहीत.

राहुल गांधी अपमान करतात तो मान्य आहे काय?

मोदींच्या संस्कार आणि सभ्यतेचा, नमस्काराचा, देशाचा राजदंड (सेंगोल) नवीन संसद भवनाची खिल्ली अमेरिकेत राहुल गांधी उडवत आहेत. भारताच्या बाहेर जाऊन बदनामी करणारे देशाभिमानी असे राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. राहुल गांधी जो हिंदू धर्माचा अपमान करतात तो राऊत आणि ठाकरे यांना मान्य आहे काय? असा सवाल यावेळी नितेश राणे यांनी केला.
 

Web Title: Sanjay Raut is the country biggest traitor, MLA Nitesh Rane criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.