Raigad: उरण एसटी स्थानकात पाण्याचा ठणठणाट : प्रवासी वाहतूकीत वाढ, मात्र प्रवाशांचा घसा कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:56 PM2023-05-29T22:56:31+5:302023-05-29T22:57:05+5:30

Raigad: उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात  पाण्याची व्यवस्था नसल्याने  प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.

Raigad: Congestion of water in Uran ST station: Increase in passenger traffic, but passengers' throats remain dry | Raigad: उरण एसटी स्थानकात पाण्याचा ठणठणाट : प्रवासी वाहतूकीत वाढ, मात्र प्रवाशांचा घसा कोरडाच

Raigad: उरण एसटी स्थानकात पाण्याचा ठणठणाट : प्रवासी वाहतूकीत वाढ, मात्र प्रवाशांचा घसा कोरडाच

googlenewsNext

- मधुकर ठाकूर 
उरण : उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात  पाण्याची व्यवस्था नसल्याने  प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.

उरण स्थानकातुन एसटी महामंडळाच्या एकूण १६ मार्गांवर २५० गाड्यांच्या फेऱ्या होतात.या २५० फेऱ्यात दररोज २० ते २२ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.मात्र प्रवासी संख्या वाढत चालली असताना मात्र प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.उरण स्थानकातच पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट जाणवत असल्याने गरीब सामान्य  प्रवाशांना बाहेरून बाटलीचे महागडे खरेदी करावे लागते.या अतिरिक्त खर्चाच्या भारामुळे प्रवासी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.

उरण स्थानकातून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होत चालली आहे.मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ पर्यंत प्रवाशांची संख्या १ लाख २७ हजार ६५६ होती.त्यामध्ये २२-२३ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्या वाढून  ३ लाख ९१ हजार ६६७ वर पोहचली आहे. मात्र या स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. चाणजे ग्रामपंचायतीकडून दिड इंच व्यासाचे पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे.मात्र बस स्थानक आणि
वर्कशॉप येथील दोन्ही वॉटर कुलर मशिन अनेक महिन्यांपासून बंद पडल्या आहेत.नवीन दोन वॉटर कुलर मशिनची मागणी आहे.मागील वेळाही काही स्वयंसेवी संस्थांकडून वॉटर कुलर मशिनची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळीही अशा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदतीची अपेक्षा आहे.
 - सतीश मालचे 
-उरण एसटी डेपो व्यवस्थापक

सध्या कडकडीत रणरणत्या उन्हात एसटी प्रवाशांची पाण्याविना तडफड सुरू आहे. त्यामुळे उरणच्या एस टी स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अमित पाटील आणि इतर प्रवाशांकडून केली जात आहे.

Web Title: Raigad: Congestion of water in Uran ST station: Increase in passenger traffic, but passengers' throats remain dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.