Jalgaon: जळगावात ३६ एकर जागेवर उभे राहणार अद्ययावत क्रीडा संकुल 

By अमित महाबळ | Published: June 8, 2023 09:02 PM2023-06-08T21:02:01+5:302023-06-08T21:02:48+5:30

Jalgaon: मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत शासकीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

Jalgaon: State-of-the-art sports complex to come up on 36 acres of land in Jalgaon | Jalgaon: जळगावात ३६ एकर जागेवर उभे राहणार अद्ययावत क्रीडा संकुल 

Jalgaon: जळगावात ३६ एकर जागेवर उभे राहणार अद्ययावत क्रीडा संकुल 

googlenewsNext

- अमित महाबळ
जळगाव  -  मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत शासकीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भूसंपादनासाठीच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली आहे. खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडू सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे या भागातील खेळाडू विविध स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 

या सुविधा
३६ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात विविध खेळांची मैदाने, धावपटूंसाठी ट्रॅक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलसाठी मैदान, टेनिस कोर्ट आदींसह खेळाडूंना लागणाऱ्या अद्ययावत सोयीसुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Web Title: Jalgaon: State-of-the-art sports complex to come up on 36 acres of land in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव